Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana Patole Sarkarnama
मुंबई

uddhav Thackeray CM News: महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री! आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले...?

Roshan More

Aaditya Thackeray News : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, काँग्रेस आणि शरद पवारांनी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवू, असे सांगत ठाकरेंची मागणी फेटाळली.

ठाकरे गटातील काही नेते उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असा दावा कर आहेत. तर काही जण आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे सांगत आहेत. याव आदित्य ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, काही जण माझा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करतात. पण मी यात पडत नाही. त्याकडे दुर्लक्ष करतो.मुख्यमंत्री म्हणून कोणी होर्डिंग लावले तर फोन करून ते काढायला सांगतो. पहिले सरकार बसवायचे आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार?

'भाजपमध्ये असलेले देखील म्हणतात की उद्धव ठाकरेसाहेब मुख्यमंत्री असताचा कार्यकाळ चांगला होता. त्यांनी चांगलं काम केलं. सगळेच मान्य करतील.निवडणुकीत विश्वासू चेहरा समोर येतो, जसा आम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघतो. विश्वासू आहे. प्रत्येकजण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून पाहतो. त्यांच काम पाहिलं आहे. शेतकरी असेल, महिला असेल, तरुण असेल एक विश्वास आहे.', असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेत फूट कोणी पाडली?

आदित्य ठाकरे यांना शिवसेनेत फूट कोणी पाडली, देवेंद्र फडणवीस की अमित शाह असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी भाजपने असे उत्तर दिले. आत्ताच भाजप हा अटबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांचा भाजप राहिला नसल्याचे ठणकावून सांगितले.

शिंदे रडत आले...

आदित्य ठाकरेंनी दावा केला की, एकनाथ शिंदे हे वर्षावर रडत आले होते. ईडीकडून आपला तपास सुरू असल्याचे ते म्हणत होते.गुन्ह्यात अडवण्याचे जे आरोप जे आमच्यावर केले जात आहेत. मुळात भाजप शिंदेंना गुन्ह्यात अडकवत होते, असे देखील आदित्य ठाकरेंनी सांगितले.

भाजपमधील पहिले पाच लोकं कोण?

भाजप आणि ठाकरे सेना पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले कोणती भाजपा. तुम्ही भाजपातील पहिले पाच लोकं पाहा. ते मुळ भाजपचे आहेत का? ही पाचही लोकं हे बाहेरचे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT