Shivsena Banner Sarkarnama
मुंबई

Shivsena Banner Dombivli : ठाकरे गटाचे भावनिक आवाहन, बॅनर लावून...

Bhagyashree Pradhan

Dombivli : उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीमधील शिवसेना शाखांना भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना चॅलेंज दिले. ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिवसैनिकदेखील कामाला लागले आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाची ताकद दाखवून देण्याचा विडाच शिवसैनिकांनी उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली येथील फडके रोडवर एक फलक लावला असून या फलकावर मतदारांसाठी संदेश लिहिला असून या संदेशाद्वारे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

'मतदारराजा हे मतदान तुझे शेवटचे मतदान ठरू नये. तुझं एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी' असा संदेश या फलकावर लिहिण्यात आला आहे. डोंबिवली (Dombivli) शहर शाखेकडून हा फलक लावण्यात आला असून या फलकावर कुठल्याही पदाधिकारी अथवा नेत्याचे नाव नाही. फलकाच्या माध्यमातून देशात हुकूमशाही सुरू असल्याचे सांगत ती उलथून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Shivsena Banner Dombivli)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फलक लावण्यात आलेल्या फडके रोडला सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. फडके रोडवर सगळ्या राजकीय सभा घेतल्या जातात. सध्या या फडके रोडवर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. याच फडके रोडवर मनसेची मध्यवर्ती शाखा आहे. इतकेच नव्हे, तर मुख्य बाजारपेठ आणि शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या गणपतीचे जुने मंदिर याच रस्त्यावर असल्याने डोंबिवलीकरांची या रस्त्यावरून ये-जा आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या या रस्त्यावर शिवसेना उबाठा गटाने लावलेला फलक मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.

निवडणुकीची तयारी...

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शिवसैनिक कामाला लागले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे, याचा विचार न करता शिंदेंना पराभूत करायचे, असा निर्धार ठाकरे गटातील शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची चांगलीच तयारी असल्याचे दिसून येते. यासंदर्भात शहर शाखाप्रमुख विवेक खामकर यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT