Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Modi : मोदींकडून मंगळसूत्रावर हात; भाजपची हीच का भूमिका...संजय राऊत यांचा सवाल

Umesh Bambare-Patil

Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या मंगळसूत्रावरुन केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी मोदींवर टीकेची झोड उठवत जो माणूस स्वत:च्या घरातील मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही, त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठाठेव करु नये, असा सल्ला दिला आहे. तसेच नरेंद्र मोदी हे बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागलेत. पाकीट मारी करायला लागलेत, हीच भाजपची भूमिका आहे का, असा सवाल ही त्यांनी केला आहे.

नरेंंद्र मोदींनी मंगळसूत्रावर केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी हे बायकांच्या मंगळसूत्रावर हात घालायला लागलेत. पाकीट मारी करायला लागलेत, हीच भाजपची भूमिका आहे का? खरंतर काँग्रेसच्या राज्यात नाही, तर भाजपच्या राज्यात महिलांचे मंगळसूत्र गहाण पडत आहेत. जो माणुस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही, त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये.

या देशातील महिलांची मंगळसूत्र का लुटली गेली, का विकली गेली? मोदींनी जी नोटबंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावी लागली, विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केलं हजारोंचा रोजगार गेला. त्यावेळेला लाखो महिलांना आपलं मंगळसूत्र विकून आपलं घर चालवावा लागलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काश्मीरमधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी व भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूरमध्ये देखील महिलांची मंगळसूत्र गेली. त्याला देखील मोदी जबाबदार आहेत. किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली? या देशात महिलांच्या मंगळसूत्रावर गणतंत्र आला असेल तर ते नरेंद्र मोदींमुळे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे, पवार गट राजकारणातून नामशेष होणार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचार गीतावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, चार जूननंतर एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे संपलेला असेल. त्यांचा एकही खासदार निवडून येत नाही. तुम्ही कोणतेही गीता तयार करा किंवा अजून काय तयार करा.

एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट चार जूननंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील. या दोघांचा एकही खासदार निवडून येत नाही, असे भाकित श्री. राऊत यांनी वर्तवले आहे.

भाजपला सांगलीची निवडणूक सोपी नाही....

सांगलीतील काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे, यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, भाजपने त्या ठिकाणी दोन उमेदवार ठेवले आहेत. आमच्या पहिलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडत आहे, त्यामुळे भाजपने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. यावर आम्ही योग्य वेळी बोलू.

या मागे कोण आहे, कोणाची प्रेरणा आहे, कोणाची ताकद आहे, हे भाजपचे कारस्थान आहे. भाजपला सांगलीची निवडणूक सोपी जात नाहीये. चंद्रहार पाटील हे झपाट्याने पुढे जात आहेत. लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतोय, त्यामुळे घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणलाय का, या संदर्भात लोकांच्या मनात शंका आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT