Sanjay Raut News : "संजय राऊत अन् उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या 10 जनपथमधील दरबारात नाचतात"

Sanjay Raut Vs Rana : "राऊतांनी देशातील कलाकारांसह अमरावतीतील महिलांचा अपमान केला आहे," असंही राणांनी म्हटलं.
uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
uddhav thackeray rahul gandhi sanjay rautsarkarnama

अमरावतीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे ( Balwant Wankhede ) यांच्या प्रचारादरम्यान खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. 'नाची, डान्सर' असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राऊतांनी राणांवर हल्लाबोल केला होता. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राऊतांविरोधात युवा स्वाभिमान पक्षानं तक्रार दाखल केली आहे. आता आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांनी संजय राऊतांचा 'जनाब' असा उल्लेख करत समाचार घेतला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

संजय राऊत काय म्हणाले?

"अमरावतीतील लढाई ही बळवंत वानखेडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही. तर, ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी, अशी आहे," असं विधान संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राऊतांनी अमरावतीतील महिलांचा अपमान केला"

यावर बोलताना रवी राणांनी ( Ravi Rana ) म्हटलं, "अमरावतीत एकवीरा मातेचं वास्तव्य आहे. या अंबा नगरीत येऊन जनाब संजय राऊतांनी लोकांतून निवडून आलेल्या खासदारांवर खालच्या स्तरावर टीका केली. संजय राऊतांची मुलगी नवनीत राणांच्या वयाची आहे. राऊतांनी देशातील कलाकारांसह अमरावतीतील महिलांचा अपमान केला आहे."

uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
Sanjay Raut News : राऊतांची भविष्यवाणी... मराठवाड्यातील चारही जागा जिंकणार; भाजपचा होणार सफाया

"बाळासाहेंनी राऊतांची हकालपट्टी केली असती"

"पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी नवनीत राणांना हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात टाकलं. आता जनाब संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांचा समर्पित केलं आहे. बाळासाहेब असते, तर जनाब राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी केली असती," असं राणांनी सांगितलं.

"राऊत अन् ठाकरेंनी हिंदू विचार सोडले"

"संजय राऊत आणि उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या 10 जनपथ येथील दरबारात नाचतात. राऊत आणि ठाकरेंनी हिंदू विचार सोडलेले आहेत. ते काँग्रेस विचार घेऊन पुढे जात आहेत. राऊतांनी नवनीत राणांबद्दल वक्तव्य करून टीआरपी मिळवला. पण, विचारधारा सोडून काँग्रेसच्या दरबारात लोटांगण घातलं आहे," असं टीकास्र राणांनी डागलं आहे.

R

uddhav thackeray rahul gandhi sanjay raut
Sanjay Raut News: तुमच्या पक्षाचा 'नमो'निर्माण पक्ष का झाला? राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊतांचं टीकास्त्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com