Udhav Balasaheb Thackeray sarkarnama
मुंबई

Shivsena Loksabha News : ठाकरेंच्या शिवसेनेचे १६ उमेदवार निश्चित; चार जागांचा तिढा कायम

Shivsena अद्याप चार लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केलेले नाहीत. यामध्ये कल्याण- डोंबिवली, मावळ, पालघर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे.

Umesh Bambare-Patil

Shivsena UBT News : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून १६ उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे, तर चार जागांवर नावे निश्चित झाली नसल्याचं समजते. ठाकरे गटाने मुंबईतील चार मतदारसंघांसह छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि इतर मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.

महायुतीतील जागावाटपाचा घोळ संपलेला नाही, तर महाविकास आघाडीतही जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेचे १६ उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये उत्तर मुंबई - विनोद घोसाळकर, इशान्य मु़ंबई संजयदिना पाटील, दक्षिण मुंबई-अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, बुलडाणा- नरेंद्र खेडकर.

तसेच यवतमाळ-संजय देशमुख, उस्मानाबाद-ओमराजे निंबाळकर, परभणी- बंडू जाधव, शिर्डी- रावसाहेब वाघचौरे, नाशिक-विजय करंजकर, ठाणे- राजन विचारे, रायगड- अनंत गिते, हिंगोली-नागेश अष्टीकर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- विनायक राऊत, सांगली- चंद्रहार पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, अद्याप चार लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केलेले नाहीत. यामध्ये कल्याण- डोंबिवली, मावळ, पालघर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. या चार मतदारसंघांबाबत उमेदवारांशी चर्चा सुरू असून, लवकरच याची नावे निश्चित केली जातील, असे ठाकरेंच्या शिवसेनेतून सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुळात कल्याणचे उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोराडे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे येथे त्यांची अडचण झाली आहे, तर जालनातून लढण्यास ठाकरे गट उत्सुक नसल्याचे चित्र आहे, तर मावळ व पालघरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. शिंदे गटाने त्यांची अडचण केली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT