Shivsena UBT News : खैरे - दानवे वादानंतरही उद्धव ठाकरे ठाम!, संभाजीनगरचा उमेदवार 'तोच'?

Chandrakant Khaire - Ambadas Danve dispute : निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आणू नका, अशी तंबी याआधीच ठाकरेंकडून दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे राज्यातील जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यापुर्वीच अनेक मतदारसंघात इच्छूक स्पर्धक ऐकमेकांना भिडत आहेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदासंघाच्या उमेदवारीवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात स्पर्धा लागली होती. गेल्या निवडणुकीत साडेचार हजार मतांनी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता.

त्यादृष्टीने खैरे कामाला लागलेले असतांना आमदार अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली. यावरून दोन दिवसांपासून खैरे-दानवे यांच्यात वाद, आरोप-प्रत्यारोप सुरू होते. एवढेच नाही तर अंबादास दानवे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले. पण या सगळ्या वादावादी आणि आरोप-प्रत्यारोपानंतरही उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Lok Sabha Election 2024 : विमानात बसण्यापूर्वी उमेदवारीसाठी शिरसाटांकडून खैरेंना शुभेच्छा; पण...

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असतील हे निश्चित झाले असून दानवे यांनाही याची जाणीव करून देण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या `भारत जोडो न्याय यात्रे`च्या मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातील समारोप सभेसाठी दानवे- खैरे यांना ठाकरेंनी मुंबईत बोलावून घेतले होते. परंतु या दोघांमधील वाद किंवा उमेदवारीच्या फेरविचारावर कुठलीही चर्चा ठाकरेंसोबत झालेली नाही.

चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आणू नका, अशी तंबी याआधीच ठाकरेंकडून दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याचे बोलले जाते. यापुढे वाद घालणार नाही, अशी ग्वाहीही खैरे-दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे बोलले जाते.

दरम्यान, महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षाचे उमेदवार मात्र अजूनही निश्चित झालेले नाहीत. संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गट लढवणार की भाजप? हे आज रात्री उशीरापर्यंत स्पष्ट होऊन उमेदवारही जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. तर भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड तयारीत आहेत.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Ambadas Danve News : अंबादास दानवेंना आईची कडक वॉर्निंग; ‘शिंदे गटात गेला तर तुझा अन्‌ आमचा संबंध संपला...’

महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत या मतदारसंघातून अपेक्षित आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी मराठा आरक्षण आणि ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन याचा फायदा उचलण्यासाठी एक किंवा दोन अपक्ष जोर लावण्याची शक्यता आहे. यात विनोद पाटील, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची नावे आघाडीवर आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com