Rahul Narwekar and Bharat Gogawle Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar : 'ठाकरे गटाला भरत गोगावलेंचा व्हीप लागू असणार' ; राहुल नार्वेकरांनी केलं स्पष्ट!

Mayur Ratnaparkhe

Shivsena MLA Disqualification Result : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. शिवाय, हा निकाल देताना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य करत शिंदे गटातील 16 आमदारांना नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे.

तसेच, भरत गोगावले(Bharat Gogawle) यांची प्रतोदपदी निवड वैध असल्याचा निकालदेखील त्यांनी दिला. यानंतर आता भरत गोगावले यांचाच व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नार्वेकर बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) म्हणाले, निवडा करताना माझ्यासमोर विधिमंडळातील दोन गट होते. त्यातील मूळ राजकीय पक्ष असून याबाबत मी निकाल दिला आहे. परिणामी एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाही. मी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली त्यांचाच व्हीप सर्वांना लागू होईल. म्हणजेच ठाकरे गटातील आमदर ज्या विधिमंडळ पक्षाच्या गटात आहेत, त्यांना भरत गोगावलेंचा म्हणजेच प्रतोदांचा व्हीप लागू असणार आहे.

ठाकरे गटाने नेमलेले प्रतोद सुनील प्रभू(Sunil Prabhu) यांचा व्हीप आमदारांना लागू होणार नाही आणि त्यामुळे शिंदेंचे आमदार हे पात्र ठरतात, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी काल दिलेला आहे. तर अध्यक्षांनी हा निकाल दिल्यानंतर भरत गोगावले यांनी सुनील प्रभूंना हाक मारून त्यांच्यापुढे हात जोडले. सुनील प्रभू हे बाहेर जायला निघताच गोगावले यांनी त्यांच्या पुढ्यात हात जोडले. यावेळी गोगावलेंच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद दिसला.

विशेष बाब म्हणजे नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवल्याने, अनेकांना आश्चर्य वाटत आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांनीही प्रतिक्रिया दिली, मात्र त्यांनी एक मोठा प्रश्नही उपस्थित केला, ज्यावरून चर्चा रंगत आहेत.

नरेश म्हस्के म्हणाले, 'जर खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची मानून विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे बारा आमदार बाद का नाही केले, अपात्र का नाही केले? यामागे कोणाचा दबाव विधानसभा अध्यक्षांवर आहे का? असा सवाल शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. संपूर्ण निकाल पत्रिका वाचून त्या पुढील धोरण आम्ही ठरवणार आहोत, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT