Sanjay Raut on Rajan Salvi Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? राऊतांनी साळवींना करुन दिली बाळासाहेबांची आठवण

Sanjay Raut on former mla Rajan Salvi over joining bjp: शिवसेनेची बस रिकामी होत नाही. बसच्या पुढल्या दारातून उतरले की मागच्या दारातून लोकं परत चढतात, आमची बस भरलेलीच आहे.

Mangesh Mahale

Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पक्षातील अस्वस्थ शिवसैनिकांना कानपिचक्या दिल्या आहेत. 'तुम्ही चार-पाच वेळा आमदार होता. एका परावभामुळे तुम्ही निघून पक्ष सोडतात..., ही नितिमत्ता आणि माणुसकी नाही,' अशा शब्दात राऊतांनी साळवींना सुनावलं.

“आमचा पक्ष म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे. शिवसेनेची बस रिकामी होत नाही. बसच्या पुढल्या दारातून उतरले की मागच्या दारातून लोकं परत चढतात, आमची बस भरलेलीच आहे. राजन साळवी हे अस्वस्थ आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. पराभवानंतर ते थोडे अस्वस्थ आहेत, राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाट्याला येतो, पण पराभव पचवायची हिंमत नसेल तर त्याने स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये," अशा शब्दात राऊतांनी फटकारलं.

“पक्ष सोडल्यानंतर राजकीय भविष्य बहरणार आहे, असं काहींना वाटतं...पण, आज पक्षानं भरभरून दिल्यामुळेच आम्हाला किंमत आहे, असे सांगत त्यांनी साळवींना पक्षाला तुम्हाला काय दिलं, याची आठवण करुन दिली.

राजकीय जीवनात एखादा पराभव वाट्याला येतो. तो पचवायची हिंमत कुणाची नसेल, तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक मानू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक जय आणि पराजय पचवले आहेत. आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आले आहेत. त्यातून आम्ही उभे आहोत, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे साळवी यांच्यासह पक्ष सोडून जाण्याची मनस्थितीत असलेल्यांना सुनावलं.

उद्धव ठाकरेंची साथ सोडून राजन साळवी हे भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांत ते निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा फोनवर संपर्क झाल्याचेही समजते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे- मुंबईतील ठाकरे गटातील काही आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT