Yamini Jadhav, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shivsena News : "बाहेर वावरताना स्वत:चा धर्म..."; बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर यामिनी जाधवांचं स्पष्टीकरण

Jagdish Patil

Mumbai News, 14 Sep : शिवसेना शिंदे गटाच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी मतदारसंघातील मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, तो कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

त्यांच्या या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी टीका केली आहेच. शिवाय महायुतीत मित्र पक्ष असणाऱ्या भाजपने (BJP) देखील त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, टीका झाल्यानंतर यामिनी जाधव यांनी आपण बुरखा वाटपाचा कार्यक्रम काय आयोजित केला होता याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाऊंवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "लोकप्रतिनिधींनी बाहेर वावरताना स्वतःचा धर्म हा पुढे न करतां आपल्या लोकांना काय हवं हे पाहणं महत्वाचं आहे."

त्या म्हणाल्या, या विधानसभा मतदारसंघात सर्वधर्मीय लोक राहतात. लोकप्रतिनिधींना त्याच्या विभागातील लोकांना काय हवं ते पहावं लागतं. मग ते कुठल्याही धर्माचे असले तरी आधी लोकांचा विचार करणं गरजेचे असतं. शिवाय लोकप्रतिनिधींनी बाहेर वावरताना स्वत:चा धर्म सतत पुढे न करता, माझ्या लोकांना काय हवं हे पाहणं गरजेचे असतं." असं स्पष्टीकरण त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलं.

मात्र, बुरखा वाटपाचा कार्यक्रमावर भाजपने नाराजी दर्शवली आहे. या कार्यक्रमावरून भाजप आमदार आशिष शेलारांनी (Ashish Shelar) शिवसेना शिंदे गटाला सुनावलं आहे. ते म्हणाले, नेमका काय कार्यक्रम झाला, याची मला कल्पना नाही. पण बुरखा वाटपासारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत.

ठाकरे गटाने डिवचलं

ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या कार्यक्रमावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे म्हणत होते की मुस्लिमांचे लांगूलचालन करणार नाही. आम्ही एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारतो यामिनी जाधव या कुणाच्या लांगूनचालन करण्यासाठी बुरखा वाटप करत आहेत. मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन करत आहात का?, असा सवाल करत त्यांनी शिंदे गटाला डिवचलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT