Ajit Pawar : अजितदादांची गृहमंत्री शहांसोबत चर्चा अन् मोदी सरकारकडून प्रश्नच 'सॉल्व'

Govt removes minimum export price cap on onion, basmati rice : बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
amit shah ajit pawar narendra modi.jpg
amit shah ajit pawar narendra modi.jpgsarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'बिहार पॅटर्न' राबवून विधानसभेनंतर मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हा दावा अजितदादांनी खोडला असला, तरी राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याचवेळी अजितदादांनी आणखी मागणी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. ती मान्य झाली असून, त्याबद्दल अजितदादांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

कांद्यासह, बासमती तांदळावरील निर्यात मूल्य रद्द करण्यासोबतच खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी अजितदादांनी ( Ajit Pawar ) गृहमंत्री शाह यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे सातत्याने केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

देशांतर्गत अन्नधान्य महागाई कमी करण्यासाठी गेल्या वर्षी लागू केलेले बासमती तांदूळ आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य (एमईपी) रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल अजितदादांनी प्रधानमंत्री मोदी ( Narendra Modi ), गृहमंत्री शाह यांचे आभार मानले आहेत.

amit shah ajit pawar narendra modi.jpg
Congress Vs NCP "त्यांनी आमच्या भानगडीत पडू नये," नाना पटोलेंचा अजितदादांच्या नेत्याला थेट इशारा

देशांतर्गत अन्नधान्याच्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी कांदा आणि बासमती तांदळावर निर्यात मूल्य लावले होते. शुक्रवारी (14 सप्टेंबर) केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य हटवले आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोयाबीनच्या किंमती वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार आहे.

amit shah ajit pawar narendra modi.jpg
Chandrashekhar Bawankule : अजित पवारांचे 25 उमेदवार निश्चित? भाजपची पहिली प्रतिक्रिया, 'जागा वाटप ...'

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी अजितदादांनी चार दिवसांपूर्वीच (दि. 11 सप्टेंबर) मंत्रालयातील त्यांच्या दालनात विशेष बैठक घेतली होती. कांदा, सोयाबीन आणि बासमती तांदळाच्या प्रश्नांसंबंधी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने कार्यवाही सुरु करण्यात आली होती.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com