Ahmednagar City Assembly Constituency : अजितदादांच्या 'नगरी' भिडूविरोधात 'मविआ'तून कोण? शिवसैनिकांनी घेतली राऊतांची भेट

Ajit Pawars candidate in Ahmednagar City Assembly Constituency did not become MVAs candidate against Sangram Jagtap : नगर शहर विधानसभा मतदार संघासाठी अजित पवार यांचा उमेदवार निश्चित झाला, असताना मविआत उमेदवारीवरून गोंधळ दिसतो.
Ahmednagar City
Ahmednagar CitySarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघाची जागा महाविकास आघाडीत कोण लढवणार, यावरून संभ्रम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं त्यांचा उमेदवार निश्चित केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या संभाव्य 25 उमेदवारांच्या यादीत आमदार संग्राम जगताप यांचं नाव समोर आलं आहे.

आमदार जगतापांविरोधात 'मविआ'कडून कोण? अशी चर्चा असतानाच, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांची सोलापूर इथं भेट घेतली. राऊतांनी शिवसेना ठाकरे पक्षच, अहमदनगर शहरातील जागा लढवणार असून, पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला. शिवसेना ठाकरे पक्षाबरोबर 'मविआ'कडून डझनभर इच्छुक असल्यानं 'नाराजां'ची संख्या अधिक असणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात अनेक राजकीय उलथापालथीचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या पहिल्या संभाव्य 25 उमेदवारांची यादी समोर आली. त्यात अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. आमदार संग्राम जगतापांना हॅटट्रिक करायची, असल्यानं त्यांनी देखील मतदार संघात जबरदस्त मोर्चे बांधणी केली आहे. अजितदादांनी देखील त्यांना बळ दिलं आहे. अजितदादांनी नगर शहर मतदार संघाला शेवटच्या टप्प्यात रस्त्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी दिलाय.

यातून अजितदादांच्या या भिडूचं बळ अधिकच वाढलं असून, नगरचं मैदान पिंजून काढत आहे. तथापि 'मविआ'कडून कोण? असा प्रश्न आहे. सध्या अजितदादांच्या भिडूविरोधात नगरच्या मैदानात चेहराच दिसत नाही. विरोधात चेहरा नसणं हाच कधीकधी मोठा धोका ठरतो. त्यामुळे लढत कोणाविरोधात हेच समजत नसल्यानं अजितदादांच्या या 'नगरी' भिडूचा काहीसा गोंधळ उडालाय. पण संयम देखील दाखवलाय.

Ahmednagar City
Ram Shinde Vs Rohit Pawar : 'या' निवडणुकीत त्यांना 'पाणीच पाज'; आमदार राम शिंदेंचं गणरायाला साकडं

शिवसेनेचे (Shiv Sena) दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचं निधन झाल्यानंतर नगर शहरातील नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न आहे. यातच शिवसेना दुभंगली. त्यामुळे नगर शहरात शिवसेनेच्या नेतृत्वाची अनेकांना, आस लागली आहे. लोकसभा निवडणुकीत 'मविआ'नं मोठं यश मिळवलं. विधानसभेला देखील 'मविआ' एकसंघपणे निवडणुकाला समोरं जात आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघात 'मविआ'तून डझनभर इच्छुक आहेत.

शिवसेनेकडून अनेकजण इच्छुक असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची पदाधिकारी वारंवार भेट घेत आहेत. यातून तिकिट कोणाला? हे स्पष्ट होत नाही. 'मविआ'कडून जागा शिवसेनेला सुटल्यास आणि शिवसेनेचा उमेदवार निश्चित झाल्यास नाराजांची संख्या अधिकच वाढले, असं भाकीत वर्तवलं जात आहे. याच नाराजांचा फटका गेली दोन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसला आहे.

Ahmednagar City
Anil Patil Politics: मंत्री अनिल पाटील म्हणतात, पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल!

'मविआ'त इच्छुकांची संख्या वाढतेय

याशिवाय 'मविआ'तील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचं नाव पुढं येत आहे. काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे इच्छुक आहे. काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगल भुजबळ देखील तयारीत गुंतल्यात. इतर छुपे इच्छुक भरपूर आहेत. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदार संघात वाढलेल्या इच्छुकांमुळे 'मविआ'तील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे, हे निश्चित!

राऊतांचा शिवसैनिकाला कामाला लागण्याचा आदेश

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत सोलापूर दौऱ्यावर असताना नगर शहरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते प्रा. शशिकांत गाडे, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव, मंदार मुळ्ये यांनी नगर शहरसाठी 'मविआ'कडून शिवसेनेला उमेदवार मिळवी, यावर चर्चा केली. संजय राऊत यांनी देखील शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि शिवसैनिकच तेथून आमदार होईल, असं सांगून कामाला लागण्याचा आदेश घेऊन हे पदाधिकारी मतदार संघात दाखल झाले आहेत. त्यामुळे 'मविआ'त उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com