Gajanan Kirtikar, Ravindra waikar  Sarkarnama
मुंबई

Gajanan Kirtikar News : शिंदेंच्या दोन शिलेदारांत जुंपली; वायकरांना म्हणाले, 'हे दोन महिन्यापूर्वींच प्रॉडक्ट...'

Political News : राष्ट्रवादी, शिवसेनेत पडलेल्या फुटीचा परिणाम निकालात दिसेल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात चुरशीने मतदान होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. विशेषतः मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होत असून सगळेच उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे या सर्वच ठिकाणी यावेळी काटे की टक्कर होणार आहे.

खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप करताना हे दोन महिन्यापूर्वीच प्रॉडक्ट असल्याचा म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीत जरी माझा मुलगा उमेदवार असला तरी मतदान करताना मी पक्षाला झुकतं माप दिले असल्याचे सांगत राष्ट्रवादी (Ncp), शिवसेनेत (Shivsena ) पडलेल्या फुटीचा परिणाम निकालात दिसेल, असा दावा खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी केला आहे.

मतदान केल्यानंतर खासदार कीर्तिकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिंदे गटाचे उमेदवार असलेले आमदार रवींद्र वायकर हे महिना दोन महिन्यापूर्वीच प्रॉडक्ट आहेत. ईडीची चौकशी झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला अटक होण्याच्या भीतीने मी पक्ष बदलला. उमेदवारी घेऊन रवींद्र वायकर यांनी आपली अटक पण वाचवली आणि ईओडब्लूची केस देखील बंद करून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

माझा मुलगा अमोल कीर्तिकर देखील निवडणूक रिंगणात आहे. पण ना मी मुलासाठी कुठे फिरलो ना मी त्याच्या बाजूने काही बोललो. रवींद्र वायकर यांच्या आणि महत्त्वाच्या बैठकांना देखील मी उपस्थित होतो. काही ठिकाणी वयोमानुसार त्यांनी मला बोलावलं नाही आणि मी देखील गेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'यंदा काटे की टक्कर'

भाजपने देशात चारशे पार आणि राज्यात 45 प्लसचा नारा दिलेला असला तरी महायुतीचेच खासदार गजानन कीर्तिकर मात्र यंदा काटे की टक्कर आहे असा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर निकालांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीचा परिणाम देखील दिसून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT