Lok Sabha Election 2024 : चारशे पारचे लक्ष्य, भाजप अशापद्धतीनं देशभरात लढवतंय निवडणूक...

BJP V/S Congress : भाजप आणि मित्रपक्ष NDA मिळून 539, तर काँग्रेस आणि मित्रपक्ष INDIA मिळून सर्वच्या सर्व 543 जागा लढवत आहेत. भाजप स्वतः 440, तर काँग्रेस स्वतः 328 जागा लढत आहे. भाजपच्या मित्रपक्षांना 99 तर, काँग्रेसने आघाडीतील घटक पक्षांना 215 जागा दिल्या आहेत.
NDA V/S INDIA
NDA V/S INDIAsarkarnama

NDA V/S INDIA : लोकसभा 2024 ( Lok Sabha Election 2024 ) च्या निवडणुकीत 'चारशे पार'चे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपने इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक म्हणजे 440 उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे केलेत. 2019 मध्येही एकट्या भाजपने सर्वाधिक म्हणजे 436 उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.

2004 च्या निवडणुकीपासून सलग 400 च्या वर उमेदवार देणाऱ्या काँग्रेसने ( Congress ), मात्र 2024 च्या निवडणुकीत केवळ 328 उमेदवार हाताच्या चिन्हावर उभे केले आहेत. 2019 मध्ये ही संख्या 421 इतकी होती. भाजपने 2019 मध्ये उभ्या केलेल्या 436 पैकी 303 जण खासदार झाले होते तर, काँग्रेसचे 421 पैकी अवघे 52 जण लोकसभेची पायरी चढू शकले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेघालय आणि नागालँड ही दोन राज्य वगळता भाजप 28 पैकी 26 राज्यात निवडणूक लढवत आहे. 26 राज्यात मिळून भाजपने कमळाच्या चिन्हावर 425 उमेदवार उभे केले आहेत. या 26 राज्यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये 277 जागांवर लढत होत आहे. 2019 मध्ये भाजपने 29 पैकी 28 राज्यात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपने नागालँड या एकमेव राज्यात उमेदवार दिला नव्हता, शिवाय पुडूचेरी या केंद्रशासित प्रदेशातही भाजपचा उमेदवार नव्हता. या निवडणुकीत भाजप एकमेव लक्षद्वीप वगळता उर्वरित सातही केंद्रशासित प्रदेशात निवडणूक लढवत आहे. सात केंद्रशासित प्रदेशातील 18 जागांपैकी 15 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस मात्र आठही केंद्रशासित प्रदेशात लढत असून काँग्रेसने एकूण 19 जागांपैकी 12 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. केंद्रशासित प्रदेशात एकूण 11 जागांवर भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. विशेष बाब म्हणजे, भाजप 15 राज्यात तर काँग्रेस 13 राज्यात अन्य कोणत्याही पक्षाशी युती-आघाडी न करता सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढत आहेत. भाजप 15 राज्यातील 209 जागा तर, काँग्रेस 13 राज्यातील 89 जागा आपापल्या चिन्हांवर लढत आहेत. The two major parties in the country BJP and Congress are contesting the 2024 Lok Sabha elections

भाजप तब्बल 11 राज्यामध्ये NDA मधील आपल्या घटक पक्षांशी युती करून निवडणूक लढवत आहे. भाजपने या 11 राज्यात 216 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले असून आपल्या मित्रपक्षांसाठी 96 जागा दिल्या आहेत. शिवाय केंद्रशासित प्रदेशातील तीन जागा देखील मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसने 15 राज्यात INDIA मधील आपल्या घटक पक्षांशी आघाडी केली आहे. काँग्रेसने 15 राज्यात 227 जागी आपले उमेदवार उभे केले असून 208 जागा आपल्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसने केंद्रशासित प्रदेशातील सात जागा देखील मित्रपक्षांना दिल्या आहेत.

NDA V/S INDIA
Rahul Gandhi News : पंतप्रधानांकडून जे पाहिजे ते बोलवून घेऊ शकतो, राहुल गांधींना आता 'हा' शब्द ऐकायचाय...

लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी भाजप आणि मित्रपक्ष (NDA) मिळून 539 जागा लढवत आहेत. भाजप स्वतः 440 जागा लढत असून (NDA) तील घटक पक्षांच्या वाट्याला 99 जागा आल्या आहेत तर, काँग्रेस आणि मित्रपक्ष (INDIA) मिळून सर्वच्या सर्व 543 जागा लढवत आहेत. काँग्रेस स्वतः 328 जागा लढत असून INDIA आघाडीतील घटक पक्षांच्या वाट्याला एकूण 215 जागा आल्या आहेत.

( Edited By : Pradeep Pendhare )

NDA V/S INDIA
Lok Sabha Elections 2024 : भाजपचं 15 राज्यांत 'एकला चलो रे!'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com