Uddhav thackeray Nana Patole  sarkarnama
मुंबई

ShivsenaUBT VS Congress : मुंबईतील जागेवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये वाद होणार? उमेदवार लागला कामाला...

Roshan More

Mumbai Political News : सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. सांगलीतील जागेवरील दावा काँग्रेस सोडायला तयार नाही. तर ठाकरेंचा उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) आपला प्रचार जोमाने करतो आहे. आता सांगलीतील जागेसोबतच मुंबईतील एक जागेवरून पुन्हा काँग्रेस ठाकरे गटात वाद होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, दोन जागा या काँग्रेससाठी सोडलेल्या आहेत. त्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात अजुनही काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. काँग्रेसकडे (Congress) या मतदारसंघात उमेदवारच नाही, असा दावा ठाकरे गटातील कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळेच या जागेवरून ठाकरे गटातील विनोद घोसाळकर हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

एकीकडे मुंबईच्या चार जागांवर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून यापूर्वीच चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई- ईशान्य संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तीकर, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई यांची नावे उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहेत.उत्तर मुंबई मतदारसंघ ठाकरेंनी काँग्रेसला सोडला मात्र येथून काँग्रेसकडून काहीच हालचाल करण्यात येत नसल्याने ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी आपला प्रचार देखील सुरू केल्याचे समजते .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमधीस संबंध ताणले गेले आहेत. आणि त्यात मुंबईच्या राहिलेल्या दोन जागेवर देखील ठाकरे गट आपला उमेदवार देणार असतील तर काँग्रेस समर्थक टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्याचा अंदाज घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT