Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Candidate list: मोठी बातमी! ...अखेर उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले; 'शिवसेनाUBT'ची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Uddhav Thackeray Candidate list: महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विदर्भातील काही जागांवरून सध्या उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू होते.

पण आता अखेर काँग्रेस आणि शिवसेना (ShivsenaUBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तणाव निवळला आहे. 'मविआ'त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांंची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहेिचा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत वरळीतून आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, चाळीसगावमधून उन्मेष पाटील, बाळापूरमधून नितीन देशमुख तर कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे.या उमेदवारी यादीत 65 जणांना संधी देण्यात आली आहे.या यादीत मुंबईतील 13 मतदारसंघाचा समावेश आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीत 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे...

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) पक्षाचं जागावाटप आता निश्चित झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांना आता 288 जागांपैकी प्रत्येकी 85-85-85 चा फॉर्म्युला समोर आला आहे. तसेच उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बुधवारी(ता.23) अनेक जणांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्म देण्यात आले. त्यात नाशिक पश्चिमचे सुधाकर बडगुजर, नाशिक मध्यचे वसंत गिते,मालेगाव बाह्यचे अद्वय हिरे ,लोहा कंधारचे एकनाथ पवार आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या के. पी. पाटलांसह अनेकांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरु होती. हा तिढा सुटत असल्याचा दावा तीनही पक्षांनी केला आहे. मुंबईमधील निम्म्या जागा ठाकरेंचा पक्ष लढणार आहे.

महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृत जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे 12 उमेदवार निश्चित केले आहेत. या उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी AB फॉर्मचं वाटपही करण्यात आलं आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT