Sindhudurg Politics News Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : सिंधुदुर्गमधील पाणबुडी प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव-

Maharashtra Politics Latest News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प आहे. हा आमच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे. मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर Sindhudurg जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली.

या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यःस्थिती व वस्तुस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. या प्रकल्पाबाबत सरकार सकारात्मक आहे. तो पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी उपस्थितांना दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते. हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला होता. यावरून विरोधी पक्षांनी राज्यातील महायुती सरकारवर गंभीर आरोप केले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांनी प्रत्युत्तर विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आणि आता या प्रकल्पासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT