Mumbai, 23 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जोरदार राडा झाला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यावरून विधान परिषदेतही आज जोरदार राडा झाला, त्यामुळे महायुतीमधील तीनही पक्षांत मोठा असंतोष आणि तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. पण त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडे २८ जागा होत्या. पण प्रत्यक्षात पाच जिल्हा परिषद फोडून भाजपने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी आपला माणूस बसवला आहे. त्यावेळी जिल्हा परिषदेत जोरदार राडा झाला होता.
पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्याचे तीव्र पडसाद आज विधीमंडळात उमटले. विधान परिषदेत शंभूराज देसाई यांनी निवेदन केल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबानाचे निर्देश दिले, त्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्षेप घेत वस्तुस्थिती समजून घेऊन उपसभापतींनी निर्देश द्यावेत, असे म्हटले.
त्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेत साताऱ्यातील घडामोडींवर निवेदन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठका झाला. त्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी भाजपच्या कामकाजावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
भाजपच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, दोन्ही सभागृहात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सदस्य, मंत्र्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. त्यामुळे अखेर दोन्ही पक्षात सातारा प्रकरणावरून निर्माण झालेली कटुता संपवण्याची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे.
बावनकुळे आणि सामंत हे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना सातारा पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की विसरून, वाद मिटवून भाजपसोबत एकत्र येण्यात यशस्वी होतात की देसाई आणि पाटील हे आपल्या म्हणण्यावर ठाम राहतात, याकडे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.