Satara ZP : शंभूराज देसाई बदल्याच्या मूडमध्ये : भाजपला सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर ठेवण्याची तयारी पूर्ण; एका परवानगीने अडला निर्णय

Shambhuraj Desai : सातारा जिल्हा परिषद युतीबाबत शिवसेनेने भाजपसोबत जाण्याची इच्छा नसल्याचे संकेत देत निर्णय एकनाथ शिंदे यांच्या हाती दिला असून राष्ट्रवादीसोबत युती कायम ठेवण्यावर भर दिला आहे.
Satara ZP-Shambhuraj Desai
Satara ZP-Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara Zilla Parishad : सातारा शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा राष्ट्रवादीशी युती करण्याचा आग्रह आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन सदस्यांनी भूमिका सांगितली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या युतीबाबत पुढील निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. तरीदेखील जिल्हा परिषद निवडणुकीआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीची असणारी युती निवडणुकीनंतरही कायम ठेवण्यावर आम्ही ठाम असल्याची भूमिका आज पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने ताकदीने चांगल्या जागा निवडून आणल्या. या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तरी झेडपीत ज्यांना पुढील पाच वर्षे उत्तम काम करायचे आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यायचे आहे, त्यांच्यासोबत जाण्याची आमची स्पष्ट इच्छा आहे. सत्तेत आल्यानंतर लोकांची कामे प्रामाणिकपणे करत न्याय दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे.

नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तर आपण निवडणुका लढतो. निकालानंतर आमच्या 15 जागा निवडून आल्या असून मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. सत्तेत सहभागी होताना तांत्रिक बाबींमध्ये शिवसेना पक्षाने मला व्हीपचा अधिकार दिला आहे.

Satara ZP-Shambhuraj Desai
साताऱ्यात शिवसेना कुणाची साथ घेणार? Shambhuraj Desai काय बोलले? Shivsena, Zp Election ,Satara

पालिका निवडणुकीत अपमान

राज्यात महायुतीची सत्त्ता असल्याने आम्ही प्रत्येक निवडणुक एकत्र लढविण्याचा आग्रह धरत होतो. त्यासाठी नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी आम्ही संपर्क केला होता. मात्र, शिवसेनेला भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. तशीची परिस्थिती जिल्हा परिषद निवडणुकीत झाल्याने आही सावध पावले टाकत असल्याचे शंभुराज देसाई यांनी सांगत शिवसेनेची भाजपसोबत युती करण्याची ईच्छा नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.

Satara ZP-Shambhuraj Desai
Satara ZP President : सातारा ZP साठी भाजपचे नवे डावपेच; शिवेंद्रराजेंवर मोठी जबाबदारी, वरिष्ठ पातळीवर ठरणार रणनीती

दोघांच्या मधोमध चालताना भिती वाटते

शिवजयंतीनिमित्त साताऱ्यात गांधी मैदानावरुन चालताना एका बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे चालत होते. आणि मला मधोमध चालण्यास सांगितल्यानंतर खरतर मला भिती वाटली होती, अशी कोपरखळीही देसाई यांनी भाजपच्या दोन नेत्यांना मारली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com