Sujata Saunik meet Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politic's : सत्तास्थापनेच्या घडामोडीत मोठी बातमी; मुख्य सचिवांनी घेतली अजित पवारांची भेट...

Sujata Saunik meet Ajit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्या (ता. 25 नोव्हेंबर) शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 24 November : विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) जाहीर झाले असून सत्तास्थापनेसाठी अवघे दोन दिवस हाती असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांच्या बैठका होत आहे.

दरम्यान, राज्यात एक महत्वपूर्ण घडामोड घडली असून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीचे कारण गुलदस्त्यात असून त्यांनी ही भेट का घेतली, अशी चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तत्पूर्वीच देवगिरी या शासकीय निवासस्थानी जाऊन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक (Sujata Saunik ) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. सत्ता स्थापनेच्या हालचालीपूर्वी सुजाता सौनिक आणि अजित पवार यांचीही भेट महत्वाची मानली  जात  आहे .

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उद्या (ता. 25 नोव्हेंबर) शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. सत्ता स्थापनेपूर्वी अजित पवार यांच्या अभिनंदनासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अभिनंदन हे निमित्त असू शकते. मात्र, सरकार स्थापनेच्या संदर्भातही ही भेट असू शकते. नव्या सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार, याची उत्सुकता आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे तब्बल 132 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाईल, असा एकंदर सूर आहे. मात्र, बिहारमध्ये कमी जागा असूनही भाजपने नीतीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. मात्र, त्यामुळे भाजप हायकमांड काय निर्णय घेईल, याचा थांगपत्ता कोणालाही लागू शकत नाही.

दररम्यान, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा झाला तरी शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे. एकनाथ शिंदे हेच नेतेपदी निवडले जातील. मात्र, ते उपमुख्यमंत्री होतील का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे अजित पवारांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्रिपदावर काम केले आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री बनणे हा निर्णय तेवढा कठीण नसेल. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो थोडा कठीण निर्णय ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT