Sunil Tatkare  sarkarnama
मुंबई

Sunil Tatkare News : राज्यात 4 जूननंतर पुन्हा भूकंप? बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार, : तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सरकारनामा ब्युरो

NCP News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. लोकसभेची निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु असून महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे सांगून सुनील तटकरे म्हणाले, या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाची महत्वापूर्ण बैठक झाली आहे. येत्या दहा तारखेला पक्षाचा वर्धापन दिन असून त्याच दिवशीचे आम्ही काही नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचाही प्रवेश होणार असून हा प्रवेश राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. श्री. तटकरे यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून नेमके काय होणार, तो नेता कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. लोकसभेच्या निकालावर भाष्य करताना तटकरे म्हणाले, चार जूनच्या चर्चा वारंवार होत आहेत. पण विजय आमचाच होणार आहे. येत्या २७ तारखेला राष्ट्रवादीची बैठक गरवारे क्लबमध्ये होणार आहे.

या बैठकीला सर्व नेते, पदाधिकारी, जिल्हा प्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये आम्ही आमचे धोरण त्यांच्या पुढे मांडणार असून आता एकच लक्ष विधानसभा धोरण असे त्यांनी सांगितले. या दिवशी अनेकांचे पक्षप्रवेश या दिवशी होतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत महायुतीने राष्ट्रीय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधकांना गल्लीपासून उत्तर देण्यात वेळ गेला आहे. जी भाषा वापरण्यात आली त्या भाषेला छेद देण्याचा प्रयत्न केला करण्यात आला आहे. याच मुद्द्यावर राज्यभरात महायुतीला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच २०१४ व २०२९ मध्ये जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळेसही मिळेल, असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ग्रामीण स्तरापासून सगळीकडे पोहोचणार आहोत. त्यामुळे या निवडणुकीवर आमचे विशेष लक्ष असेल. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर सरकार बैठक घेणार आहे. तातडीने उपाय योजना कराव्यात अशी विनंती आम्ही सरकारला केली आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT