Mumbai News : मुंबईत ड्रोन उड्डानाला बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ’मातोश्रीजवळ फिरणाऱ्या ड्रोनवरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. त्यासोबतच यापूर्वी घडलेला प्रसंग सांगत त्यांनी जोरदार टीका केली आहे.
रविवारी सकाळी आमच्या निवासस्थानाजवळ एक ड्रोन उडताना आणि घरात डोकावताना पकडण्यात आला. माध्यमांना याची माहिती मिळताच, MMRDAOfficial कडून सांगण्यात आले की हे बीकेसी परिसराच्या सर्वेक्षणासाठी मुंबई पोलिसांच्या परवानगीने करण्यात आले होते, असे या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंनी (Aditya thackeray) म्हटले आहे.
कोणता सर्वेक्षण असा असतो की जो घरांच्या आत डोकावतो आणि दिसताच लगेच उडून जातो? रहिवाशांना याची माहिती का देण्यात आली नाही? एमएमआरडीए संपूर्ण बीकेसीचे सर्वेक्षण करत आहे की फक्त आमच्या घरावर नजर ठेवत आहे? एमएमआरडीएने ड्रोन उडवण्यापेक्षा जमिनीवर उतरून स्वतःच्या कामाच्या ढिसाळपणाकडे लक्ष द्यावे. जसे की एमटीएचएल (अटल सेतू) हा त्याच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे. पोलिसांनी जर परवानगी दिली होती, तर रहिवाशांना आधी का सांगितले नाही? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ड्रोन मातोश्रीबाहेर उडत असल्याचा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी शेअर करत म्हटले की, 'ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या 'मातोश्री' निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?'
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून मुंबईतील वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे भाजपकडून (BJP) या प्रकारनंतर मातोश्रीबाहेर ड्रोनने घिरट्या घातल्यानंतर हा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्टंट असल्याचा आरोप केला आहे. तर, ठाकरेंना स्टंट करण्याची गरज नाही. ती गरज भाजपला आहे तेच स्टंट करत आले असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे एकंदरीतच दोन्ही बाजूनी करण्यात येत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाने वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.