Sushma Andhare-Prajakta Mali-Suresh Dhas Sarkarnama
मुंबई

Andhare On Prajakta Mali : सुषमा अंधारेंची प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेवरच शंका; ‘बीडमधील मोर्चाला काउंटर करण्यासाठी...’

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख प्रकरण बाजूला सोडायचं आणि जाणीवपूर्वक प्राजक्ता माळी नावाचं प्रकरण पुढे आणायचं, हे कोणी सांगितलं?

Vijaykumar Dudhale

Mumbai, 29 December : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये शुक्रवारी (ता. २८ डिसेंबर) निघालेल्या मोर्चाला काउंटर करण्यासाठी प्राजक्ता माळीची ती पत्रकार परिषद झाली. निषेध मोर्चाची सर्व चर्चा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झालेला आहे. संतोष देशमुख प्रकरण बाजूला सोडायचं आणि जाणीवपूर्वक प्राजक्ता माळी नावाचं प्रकरण पुढे आणायचं, हे कोणी सांगितलं, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुमषा अंधारे यांनी केला.

प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) हिने काल पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र, प्राजक्ता माळी हिच्या पत्रकार परिषदेवरच सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेणं, हे मला अप्रस्तूत वाटलं. मला ते पटलंच नाही. प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद घेण्याची कालची वेळ ही पोलिटिकल मोटिव्हेटेड वाटते, असा आरोपही अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, आमदार सुरेश धस यांचे विधान अत्यंत प्लेन स्टेंटमेट आहे, उगीच त्याला मोडून तोडून द्यायची गरज नाही. आक्षेप घ्यायचा असेल तर खरं आक्षेपार्ह विधानं दीड महिन्यापूर्वी करुणा मुंडे यांच्या तोंडून आलं होतं. करुणा मुंडे यांच्याकडून जेव्हा विधान आलं, तेव्हा प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद का घेतली नाही. त्या वेळी तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तसं ती आताही करू शकली असती. यात प्राजक्ता माळी हिलाही त्रास होत असेल. कशासाठी हे नाटक केले जातंय. पण कालच्या पत्रकार परिषदेची वेळ ही पोलिटिकल मोटिव्हेटेड वाटते.

सत्याला स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. मात्र, पत्रकार परिषद घेऊन कोणाला सांगायचं आहे. मित्र तुम्हाला स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पृथ्वीचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा म्हणून प्राजक्ता माळी हिने विषय सोडून द्यायला हवा होता, असेही मत अंधारे यांनी व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, महिलांना तुम्ही काय समजता? इथल्या पुरुष व्यवस्थेच्या सत्तेमध्ये बाईचं कर्तृत्व शून्यच ठरवलं जातं. पण हे जेव्हा प्राजक्ता माळीसारख्या सेलिब्रेटिज असतात, त्याच वेळी हे सूचतं का. सुषमा अंधारेंच्या बाबत संजय शिरसाट जेव्हा गलिच्छ भाषेत बोलतात, तेव्हा साधी पोलिस तक्रारही लिहून घेतली जात नाही. ज्या अब्दुल सत्तार यांनी लाईव्ह कॅमऱ्यासमोर अगदी गलिच्छ भाषा सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरली, त्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात समील करून घेणारेही हीच मंडळी होती ना?

सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात आगपाखड करायची गरज नाही. भाजपची मातृसंस्था आरएसएस आहे. प्राजक्ता माळी ही जेव्हा आरएसएसच्या मुख्यालयात जाते, तेव्हा त्या कलाकार राहत नाहीत. त्या वेळी त्यांचा एक पोलिटिकल स्टॅंड आहे, राजकीय विचार करण्याचा एक दृष्टीकोन आहे, असे समजले जाते. महिलांविषयी कोणीही पायरी सोडून बोलू नये. पण त्या स्टेंटमेंटला मोडून तोडूनही दाखवू नये, असेही सुषमा अंधारे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT