Thane Election Voting LIVE Sarkarnama
मुंबई

Thane Election Voting LIVE: बोगस मतदानासाठी लोक आणून ठेवलेत; ठाकरे गटाचे उमेदवार भडकले

Thane Lok Sabha Election 2024 Voting LIVE : "बोगस मतदानासाठीसुमारे दीड हजारांवर लोक यासाठी आणून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जागरूक मतदारांनी मतदानासाठी पुढे यावे. बोगस मतदान झाले असल्याची त्याची तक्रार करावी".

Pradeep Pendhare

Thane News 20 May : ठाणे लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिक आमने-सामने आहेत. तिथे सकाळपासून मतदान सुरू आहे. सकाळच्या सत्रात ठाण्यातील बहुतांशी मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार खासदार राजन विचारे आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नरेश मस्के यांच्यात सरळ लढाई आहे. दोन्ही शिवसैनिक समोरासमोर असल्याने निवडणूक चुरशी आहे. या मतदारसंघातील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान सुरू आहे. परंतु बहुतांशी मतदान केंद्रावर मूळ मतदारांनी मतदान करण्याअगोदरच त्यांचे बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे.

मतदानासाठी गेलेल्या मतदारांना मतदानाला गेल्यावर तिथे दुसरे कोणीतरी मतदान केल्याचे निदर्शनास आले. या मतदारसंघात 24 लाख 9 हजार 513 मतदार असून, मराठी मतांचा टक्का आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही शिवसेना गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

ठाकरे पक्षाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी सहकुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. ठाण्यातील सिद्धिविनायक, धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तिस्थळ आणि भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. मतदारांनी निवडणुकीचे महत्त्व समजून घ्या आणि मतदानाचा हक्क बजवा,असे आवाहन राजन विचारे यांनी केले.

ठाण्यातील अनेक केंद्रावर बोगस मतदानावरून राजन विचारेंनी संताप व्यक्त केला. राजन विचारे म्हणाले, "बोगस मतदानासाठी ठाण्यातील काही भागात बाहेरून लोक आणून ठेवले आहेत. सुमारे दीड हजारांवर लोक यासाठी आणून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जागरूक मतदारांनी मतदानासाठी पुढे यावे. बोगस मतदान झाले असल्याची त्याची तक्रार करावी".

निवडणूक आयोगाने देखील याबाबत कारवाई करावी, मतदार यादीतून नाव असेल, त्यावर डिलिट, असा शिक्का असेल, तर 17 नंबरचा अर्ज भरून मतदानाचा हक्क बजवा. याबाबत अधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्यास त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, असेही राजन विचारे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT