Lok Sabha Election 2024 Voting : नाशिक, दिंडोरीत महायुतीला 'कांदा'रडवणार? कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रावर

Onion Price Issue : नाशिकमध्ये मतदानावेळी चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मतदानाला जाताना गळ्यात कांद्याच्या माळा घालून गेले. कांद्याच्या माळा घालून शेतकरी संघटीतपणे मतदान केंद्रावर आल्याने पोलिसांशी त्यांचा वाद झाला.
Nashik Onion Price Issue
Nashik Onion Price Issuesarkarnama

Nashik News : पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान सुरू असताना अनेक केंद्रावर गोंधळ उडालेला दिसतो. यावर राजकीय नेते प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत. नाशिकमध्ये शेतकरी तसेच सटाण्यात माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेले.

Nashik Onion Price Issue
Chhagan Bhujbal Politics : '...म्हणून नाशिकच्या दोन्ही जागा महायुती जिंकणार' ; छगन भुजबळांचा दावा!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 49 मतदारसंघात मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात निवडणूक होत आहे. नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नाशिकमध्ये सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे, तो कांद्याचा भाव. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. यावर शेतकरी नाराज आहे. केंद्र सकारने कांदा निर्यात बंदी केल्याने दर कोसळत असल्याचा आरोप शेतकरी आणि शेतकरी संघटनेंकडून होत आहे. महायुती भाजपला Bjp कांद्याचा दर रडवणार असल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकमध्ये मतदानावेळी चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी मतदानाला गळ्यात कांद्याच्या माळा घालून गेले. संघटीतपणे कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावर आल्याने त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी मतदार शेतकरी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी कांद्याच्या माळा मतदान केंद्रात घेऊन जाण्यात मज्जाव केला. कारवाईचा इशारा दिला. यावरून मतदान केंद्राबाहेर काहीसा गोंधळ झाला. यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा काढून केंद्रात गेले. तसेच सटाण्यातील मतदान केंद्रावर माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण देखील कांद्याच्या माळा घालून आले होते. त्यांनी तिथे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, नाशिकमधील लासलगावमध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi नाशिकमधील सभेत तरुण शेतकऱ्यांनी कांद्यावरून बोला, अशी मागणी केली होती. तशी घोषणाबाजी केली होती. त्यावेळी सभेत गोंधळ उडाला होता. आता तर शेतकऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदानासाठी कांद्याच्या माळा घालून गेले. अहमदनगर पाठोपाठ नाशिकमध्ये कांद्याच्या माळा घालण्याचा प्रकार झाला आहे.

Nashik Onion Price Issue
Shantigri Maharaj News : मतदानानंतर काही तासांतच शांतिगिरी महाराजांना मोठा धक्का; नाशिकमध्ये 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com