NCP Thane News Sarkarnama
मुंबई

NCP Thane News : शरद पवार गटातील 'त्या' पदाधिकाऱ्यांची परांजपेंनी नावे केली उघड; 'यांना माणसंही...'

Chetan Zadpe

Mumbai Political News : नुकतीच ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने जम्बो कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीत ज्या पदाधिकाऱ्यांना पदे दिली आहेत, ते पदाधिकारी आपलेच असल्याचा दावा करत, उपाध्यक्ष शशिधर जाधव, सुनील पाटील, सुरेश जाधव, सुनील कुलकर्णी अशा अनेक पदाधिकाऱ्यांची नावेच जाहीर करीत अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी शरद पवार गटाने जाहीर केलेली यादीची पोलखोल केली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागे ९ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी अजित पवार यांच्या हस्ते अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली होती.

त्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी त्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पदे दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी केला.

आगे आगे देखो होता है क्या ?

तसेच शरद पवार यांच्या गटाच्या यादीत आमच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश केला, असे सांगत त्यांना माणसं मिळत नसल्याचा टोलादेखील परांजपे यांनी लगावला. आगे आगे देखो होता है क्या ? असा सूचक इशारादेखील त्यांनी दिला. आम्हाला कोणताही दावा करायचा नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मी व नजीब मुल्ला दोघेही ठाण्यामध्ये मजबुतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस रोवलेली आहे, असेही ते म्हणाले.

"येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबुतीने संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात उभी राहिलेली आपल्याला दिसेल. यामुळे आम्ही रडीचा डाव खेळत नाही, आमचा आमच्या कामावर विश्वास आहे. आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार, युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, कार्याध्यक्ष संदेश पाटील असतील, परिवहन सदस्य मोहसीन शेख असतील, पॅरेन्टस् बॉडीचे सर्व पदाधिकारी आम्ही काम करत आहेत," असेदेखील त्यांनी या वेळी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT