NCP And Thane : राज्याच्या राजकारणात वर्षभरातच रविवारी (दि.२) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केले. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचनाक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांना धक्का दिला. यावेळी अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. (Maharashtra Political News)
राज्याच्या राजकारणात रविवार (ता. २) भूकंपाचा दिवस ठरला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे सरकारला पाठिंबा देत, राज्याच्या सत्तेत सहभागी झाले. त्याचे पडसाद पुण्यासह ठाण्यातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी रविवारी अजित पवार यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. तसेच अजित पवार यांच्या निकटचे समजले जाणारे ठाण्यातील माजी नगरसेवकही आता 'नॉट-रिचेबल' झालेले आहेत.
अजित पवार यांनी युती सरकारला पाठिंबा दिला. यानंतर आता ठाणे शहरातही त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाले आहेत. यात नजीब मुल्ला यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यात मागील काही वर्षांपूर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आनंद परांजपे यांनीही रविवारी (ता. २) दुपारनंतर अजित पवार यांना समर्थन देत देवगिरीवर हजेरी लावली होती. याला परांजपे यांनी दुजोरा दिला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चर्चा सुरू होती. त्यात आज राज्यात झालेल्या भूकंपनंतर ठाण्यातही पक्षाच्या काहींनी जितेंद्र आव्हाडांची साथ सोडत अजित पवारांना टाळी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाण्यातही आता सुपडा साफ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.