Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : " नशीब... निवडणूक आयोगानं माझं नाव त्यांना दिलं नाही!" ; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Maharashtra Politics : ...त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा!

Deepak Kulkarni

Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांनी सातत्याने निवडणूक आयोग, शिंदे गट आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहेत. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी निवडणूक आयोगाला खोचक टोला लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोमवारी मुंबईतील'अवतरनार्थ' या मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपले यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले,एका कार्यक्रमात निवडणूक आयोगाने माझ्या पक्षाचे शिवसेना नाव त्यांना दिले.धनुष्यबाण चिन्हही त्यांना दिले.फक्त माझे नाव तेवढे बदलून निवडणूक आयोगाने दिले नाही,असा हल्ला ठाकरेंनी हल्ला चढविला.

तसेच आम्ही दिलेला निर्णय विधिमंडळ नाकारू शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षाना फटकारले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.यावेळी ठाकरे म्हणाले,सध्या केंद्र सरकारकडून देशात तपास यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. सध्या जिकडे तिकडे ईडीचा कारभार सुरु आहे. प्रबोधनकार हे अनेकांना हवेहवेसे वाटत होते. प्रबोधनकार हे बुडताना वाचवले पाहिजे,या मतांचे होते. प्रबोधनकार यांना कधीच हरण्याची व जिंकण्याची भीती नव्हती असेही ठाकरे म्हणाले.

हिंदुत्वाचे पेटंट भाजपने घेतलेले नाही...

मी मुख्यमंत्री होईल असे कधीच वाटले नव्हते. मला मुख्यमंत्री करण्यास शरद पवार हेच जबाबदार आहेत. काही जण आम्ही काँग्रेससोबत गेल्याने काँग्रेसचे झालो असा आरोप करीत आहेत. मात्र आम्ही ३० वर्ष भाजपसोबत राहिलो मत आम्ही भाजप(BJP)चे झालो नाहीत. त्यामुळे आमची काळजी करू नका.

काँग्रेससोबत गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडले नाही. भाजपला सोडले आम्ही हिंदुत्व सोडले नाही. हिंदुत्वाचे पेटंट भाजपने घेतले नाही. भाजपचे हिंदुत्व आम्हांला मान्य नाही, असे म्हणत ठाकरेंनी टीकेची झोड उठवली.

खाल्लेल्या घराचे वासे मोजू नका

काहीजण मी नेहमीच घरी बसतो म्हणून माझ्यावर टीका करत असतात.आज दुपारी पण त्यांनी माझ्या घरी बसण्यावर टीका केली.पण जे आतापर्यंत माझ्यासोबत होते, त्यांनी खाल्लेल्या घराचे वासे मोजू नयेत अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT