Rajesh Tope-Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP News : ‘...तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादा गटातील आमदार परत येतील’

Rajesh Tope Claim : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांमध्ये आता वरून जरी अस्वस्थता दिसत नसली तरी त्यांच्या मनात शंभर टक्के अस्वस्थता आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदारांमध्ये आता वरून जरी अस्वस्थता दिसत नसली तरी त्यांच्या मनात शंभर टक्के अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले नाहीतर अजितदादा गटातील आमदार विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते राजेश टोपे यांनी केला आहे. (...then MLAs from Ajitdada group will return before assembly elections : Rajesh Tope)

खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉईंट’ या कार्यक्रमात बोलताना राजेश टोपे यांनी हा दावा केला आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकालही येत्या १० जानेवारी जाहीर केला जाणार आहे.

त्या निकालाकडेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे लक्ष असणार आहे. तो निकाल शिंदेंच्या विरोधात गेला तर अजितदादा गटातील आमदारही काळजीत पडू शकतात. त्यामुळे टोपे यांच्या दाव्याला महत्व येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी मंत्री टोपे म्हणाले की, अजितदादा गटातील आमदारांच्या मनात निश्चितपणे धाकधूक आहे. त्यांच्या मनात एक प्रकारची भीती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार केंद्रात आले नाहीत, तर हेच आमदार शरद पवार यांना येऊन भेटतील. विनंती करतील, आपण माफी मागूया, असे सांगून ते पवारांकडे येतील. भाजपचे केंद्रात सरकार आले नाही तर अजितदादा गटातील आमदार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच परत येतील.

अजित पवार गटातील आमदार सध्या वरून जरी अस्वस्थ दिसत नसले, तर मला शंभर टक्के खात्री आहे की, मनातून ते पूर्णपणे अस्वस्थ आहेत. त्यातूनच पुढच्या घडामोडी घडतील, असेही टोपे यांनी नमूद केले.

राजेश टोपे यांच्या या विधानानंतर आता अजितदादा गटाकडून कोणते उत्तर येते, हे पाहावे लागेल. कारण, हे दोन्ही गट एकमेकांवर एकही टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

आता शरद पवार गटातील राजेश टोपे यांनी अजित पवार गटातील आमदारांनाच चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर अजितदादा गटातील नेत्यांकडून कशाप्रकारे दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT