Nashik News : 'अरं बाबा, आता त्याचा माझा काय संबंध येतो? मी ठाम होतो, पण तेव्हा होतो. आता मी त्या ठिकाणी नाही. त्यामुळे मी त्या प्रकरणावर बोलणार नाही,' असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. (Narhari Zirwal's answer to question of Shiv Sena MLA disqualification case)
शिवसेना आमदार पात्रता प्रकरणावरील विधानसभाध्यक्षांपुढील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल येत्या १० जानेवारीला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रश्न विचारताच त्यांनी त्याचा माझा काय संबंध असे म्हणत अंग झटकून टाकले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वास्तविक, मागील काळात या प्रकरणावर बोलताना उपाध्यक्ष झिरवाळ यांनी हा विषय माझ्याकडे आला असता त्यावर मी तातडीने निर्णय दिला असता, असे सांगितले होते. तसेच, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस असताना बंडखोर आमदारांवर मी अपात्रतेची कारवाई केली असती, असे विधान केले होते. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर झिरवाळ जाम वैतागले.
मोटार परिवहन विभागातील आठ महिला पोलिस शिपायांवर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्याचार केला असून त्या गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी आपण मुंबईत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.
ज्यांच्याकडून सुरक्षेची अपेक्षा आहे, त्यांनाच सुरक्षेची गरज वाटायला लागली तर त्यापेक्षा वाईट काही नाही. निश्चितपणे गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर ती अतिशय निंदनीय बाब आहे. त्यांच्याकडे आपण सुरक्षेची अपेक्षा करतो. त्यांचीच सुरक्षा धोक्यात आली असेल तर या सर्व गोष्टींना काही अर्थच राहिला नाही, असेही आमदार झिरवाळ यांनी नमूद केले.
निकालाकडे लक्ष
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे येत्या १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. त्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. नार्वेकर काय निकाल देणार, कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.