Balasaheb Thorat, Ajit Pawar, Nana Patole Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : 'यांना' मंत्री व्हायचंय, खुर्ची, सरकारी बंगला पाहिजे, पण काम करायला नको; अजितदादा बरसले

Maharashtra Budget Session 2023: अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी कोडगेपणाचा कळस केला

सरकारना ब्युरो

Maharashtra Opposition Leader : अधिवेशनात चर्चा करताना २९ चं कोरम पूर्ण करण्याची जबाबदारी सत्ताधारी, संसदीय कामकाज मंत्र्याची असते. या अधिवेशनात मंत्र्यांची उपस्थिती नगन्य होती. त्यामुळे अनेक प्रश्न राखून ठेवण्यात आले. मंत्र्यांअभावी वारंवार लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आली. यांना मंत्री व्हायचे असते. त्यांना खुर्ची हवीय. सरकारी बंगाल अन् संरक्षणही पाहिजे, पण काम करायला नको, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आज संपले. त्यानंतर विरोधीपक्षाने पत्रकार परिषद घेत अधिवेशात सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या बेजाबदारपणाचा पाढाच वाचला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधारी कसे कोडगे झालेत याची अनेक उदाहरणे सांगितली.

पवार म्हणाले, "विधीमंडळाचे अधिवशन हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे. मात्र विधीमंडळाबाबत कामाबाबत सत्ताधाऱ्यांची अनास्था दिसून आली. ही बाब लोकाशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. विधीमंडळातील कामकाजाकडे सरकार याकडे गांभीर्याने पाहणार नसेल तर जनतेच्या प्रश्न कसे सुटणार? मागच्यावेळेस अधिवेशनात सांगितलेल्या बैठकाही घेतल्या जात नाहीत. फक्त वेळ मारुन नेण्याचे काम केले जात आहे. चर्चा एका विभागाबद्दल अन् उत्तर देतोय दुसऱ्या विभागाचा मंत्री. त्यावर आक्षेप घेतला तर नोंद घेतायत म्हणून सांगितले जात होते. असे कुठे काम असता का? "

दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी त्यांच्या सभासद, मंत्र्यांची कानउघाडणी केलेल्याचे अजित पवारांनी सांगितले. तुम्हाला बसायला का नको वाटते? इतर सभासदांना यायचं असेल तर येतील, मात्र आता तुम्ही सत्तेत आहेत तर काम केले पाहिजे, असे कोळंबकर म्हणाले होते. त्यानंतरही मंत्र्यांनी दांडी मारली.

महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांनी बेजबाबदारीचे काम केल्याचे पाहिले नाही. मंत्र्यानी दिलेली माहिती परिपूर्ण नव्हती. मीही वारंवार सूचना केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा कोडगेपणाचा कळस पहायला मिळाल्याचा घणाघात पवार यांनी केला.

सत्ताधाऱ्यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा पायंडा पाडल्याचेही पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. यांना सत्ताही भोगायची आणि आंदोलने करायची आहेत. या आंदोलनामुळे विधीमंडळाच्या पावित्र्याचा भंग झाला आहे. दरम्यान, मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. मंत्रीमंडळात महिलांना स्थान नाही. अधिवेशनात महिलांच्या क्षमतांबद्दल शंका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT