Udhav Thackeray, Sanjay Raut, Sanjay Pandey sarkarnama
मुंबई

Mumbai BJP News : दोन दोन बंगले बांधून मुंबईकरांच्या हातावर वडापाव टेकवला : भाजपच्या या नेत्याची ठाकरेंवर टीका

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मुंबई मनपात गोचिडासारखे घुसून त्यांनी मुंबईकरांच्या कष्टाचा, घामाचा पैसा लुटला. दोन - दोन मातोश्री बंगले उभारलेत. बदल्यात मुंबईकरांच्या हातावर वडापाव ठेवण्याचं काम यांनी केलंय, अशी टीका भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडेय यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांकडील आलिशान गाड्या, हातातील घड्याळे यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत सडेतोड टीका केली होती. या टीकेला भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडेय यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी त्यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला.

संजय पांडेय यांनी म्हटलं की, मातोश्रीचा अर्थसंकल्प बिघडल्यानं राऊतांच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे. नको तिथं तोंड चालवून राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला आहे. बीएमसीच्या चाव्या हातातून गेल्यापासून कंत्राटातली टक्केवारी बंद झाली. मालक आणि नोकराला फारशी कामं उरली नाहीत, म्हणून ते इतरांच्या हातातले घड्याळ, गाड्या, पेन पाहत बसलेत. बीएमसीला भ्रष्टाचाराचा अड्डा तुम्ही केला आहे. तुमच्या काळात लोक बीएमसीला 'बृहन्मुंबई मनी करप्शन' म्हणायचे, असा टोला त्यांनी लगावला.

संजय पांडेय म्हणाले, कोरोना काळात तुम्ही हजारो कोटींची खिचडी खाल्ली, ऑक्सिजन प्लांट खाल्ले, रेमडेसिव्हर खाल्ले हे सारं कमी होतं म्हणून मुंबईचे रस्ते खाल्ले. अलिबागमध्ये प्राॅपर्ट्या घेतल्या. पत्रचाळी प्रकरणात तुरुंगवास भोगून आलेल्या राऊतांनी भ्रष्टाचारावर बोलणं हस्यास्पद आहे. मुंबई मनपात गोचिडासारखे घुसून यांनी मुंबईकरांच्या कष्टाचा, घामाचा पैसा लुटला. २-२ मातोश्री बंगले उभारले. बदल्यात मुंबईकरांच्या हातावर वडापाव ठेवण्याचं काम यांनी केलंय, अशी टीका उद्धव ठाकरेंवर त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय पांडेय म्हणाले, २०१९ ला निवडणूक निकालानंतर तुम्ही बाळासाहेबांना सोडून पवारांच्या मांडीवर बसलात. तेव्हा तुम्ही बाप बदलल्याची टीका झालीच होती. बाप कोण आणि पोरगा कोण? यावर बोलायला गेलात तर तुमची खूप अडचण होईल. राऊत बात निकलेगी तो दूर तक जाएगी..., एवढंच ध्यानात ठेवून शांत राहावं, असा सल्ला त्यांनी दिला. मातोश्रीच्या आवारात मालकासमोर राऊतांनी खुशाल शेपूट हलवावी, पण रस्त्यावर येऊन भुंकू नये. नाहीतर मनपाकडे भटक्या श्वानांना पकडण्यासाठीच्या भरपूर गाड्या आहेत. एक कलानगरला पाठवावी लागेल.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT