Anil Parab Sarkarnama
मुंबई

परिवहन मंत्री परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला अखेरचा इशारा...

Anil Parab|ST Strike: आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागू दिला नाही मात्र, वारंवार जनतेला वेठीला धरण्याचे काम झाले, असे अनिल परब म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात सुमारे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलनाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. काल उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या निर्णयावर नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर दुपारी ३ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक करत घोषणाबाजी केली. यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आंदोलनाची चौकशी करुन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या आंदोलनानंतर परबांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याचा कुणीतरी प्रयत्न करत आहे. कर्मचाऱ्यांनी कुण्याच्या बोलण्यात येऊ नये. त्यांच्यावरील कारवाई आम्ही मागे घेतली असून एसटी सुरळीत सुरु व्हावी हे सर्वांसाठीच चांगले आहे. मात्र, आजच्या घटनेची चौकशी होऊन कारवाई होणार आहे. महामंडळ तोट्यात असूनही आम्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही. तसेच कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागू दिला नाही. वारंवार जनतेला वेठीला धरण्याचे काम झाल्याचे परब म्हणाले आहे.

परब म्हणाले, आम्ही कर्मचाऱ्यांना आवाहन करत आहे की, त्यांनी कामावर रुजू व्हावे. तसेच, सदावर्ते यांचे ऐकायचे की, कोर्टाचे ते कर्मचाऱ्यांनी ठरवावे. आजच्या घटनेची गृहमंत्री चौकशी करतील आणि कारवाई होईल. कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर यावे अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला.

दरम्यान, पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले असून झालेल्या घटनेवर विरोधक तथा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आंदोलन चिघळू नये यासाठी अऩिल परब यांच्या निवासस्थानची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT