Maharashtra FDA news : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून महाराष्ट्रात भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. आता मुंढे यांच्या विभागाने ते बॉलीवूड स्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर स्टार या तिघांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली आहे.
FDA च्या मुंबई विभागाने तीन अभिनेत्यांना नोटीशीद्वारे कारवाईचा इशारा दिला आहे. पानमसाल्याचे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केल्याप्रकरणी पुढील १५ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. खुलासा न केल्यास किंवा खुलाश्यातील माहिती समाधानकारक नसल्याचे कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांच्या विभागाने दिला आहे.
नेमकं काय घडलं?
FDA कडून शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना १४ ऑगस्टला नोटीस पाठविण्यात आली आहे. 'विमल इलायची'च्या जाहिराती संदर्भात ही नोटीस आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यात बंदी असलेल्या विमल पानमसाल्याची अप्रत्यक्षपणे जाहिरात होत असल्याचा ठपका एफडीएकडून ठेवण्यात आला आहे.
नोटिशीद्वारे तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. जाहिरातीमुळे अन्य सुरक्षा कायदा २००६ चे उल्लंघन होत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. प्रथमदर्शनी ही जाहिरात ‘विमल’ ब्रँडचा प्रचार करते. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी संबंधित आहे. राज्यात आयुक्तांनी १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या प्रतिबंधक आदेशानुसार, राज्यात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.
एफडीएच्या म्हणण्यांनुसार, अशाप्रकारच्या जाहिरातींची तपासणी सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीचे सादरीकरण, संवाद, उत्पादनाचे नाव आणि बाजारपेठेतील संदर्भ पाहिल्यानंतर ही जाहिरात प्रतिबंधित तंबाखूसंबंधित उत्पादनाचा अप्रत्यक्षपणे प्रचार तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.