Mumbai political news : भाजप मुंबईचे शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय राजकारण घुसवत आहेत. मुंबईचे 'ममदानीकरण' करत आहेत. मुंबईचा रंग बदलवत आहे, असा गंभीर आरोप केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत, उद्धव यांना यावर प्रश्न विचारताच, 'कोण? चाटम.., चाटम का..? नीट ऐकायला आलं नाही,' असे ठाकरी शैलीत सुनावलं.
मुंबई (BMC Election) महापालिका निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसे, अशी युती समोरे जात असताना, काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोघा ठाकरे बंधूंनी संवाद साधला. मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केलेल्या टिकेवर उद्धव यांनी 'ठाकरी' शैलीत सुनावलं.
तत्पूर्वी वरळी डोम इथं भाजपचा (BJP) मेळावा झाला. यात अमित साटम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. मुंबईच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय राजकारणाने एन्ट्री घेतली आहे. न्यूयाॅर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी उमर खालिद याला पाठिंबा दिला. त्या उमर खालिदची सभा मुंबईत झाली, तिथं आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे लोक गेले होते, असा गंभीर आरोप केला.
तसंच, 'मुंबईचे आम्ही 'ममदानीकरण' होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयाॅर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही,' असा इशारा देखील अमित साटम यांनी दिला होता. यावर बोलताना, उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांच्या जिव्हारी लागेल, असा 'ठाकरी' घाव घातला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, 'असं कोण म्हणालं? कोण म्हणालं? असं विचारत असतानाच समोरच्या पत्रकाराने मुंबईचे भाजपचे अध्यक्ष बोलले आहेत. यावर ठाकरेंनी, 'चाटम.., चाटम.., काय मला ऐकायला नाही आलं, माईक द्या ना जरा! चाटम..,' एवढं बोलून सुनावलं.
उद्धव ठाकरे यांनी चाटम.., असा केलेला अमित साटम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, त्यांनी देखील तत्काळी प्रत्युत्तर देत, 'माझे आडनाव मोठे आहे किंवा मी मोठ्या कुटुंबातून आलो म्हणून मी इथं तुमच्यासमोर बसलो नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे मी इथं तुमच्यासमोर बसलो आहे. मी सर्वसामान्य घरातीलच असल्याने उद्धव ठाकरे यांनी मला शिवी दिली नाही, तर मुंबईच्या मध्यमवर्गीय गरीब माणसाला, कोकणी माणसाला, मालवणी माणसाला शिवी दिली आहे,' असेही साटम यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.