Dhananjay Chandrachud  Sarkarnama
मुंबई

Shivsena Party & Symbol Case : शिवसेना कोणाची? निकाल कधी? सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल नाहीच

Supreme Court verdict on Shiv Sena Party Dispute Delayed: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयात 10 नोव्हेंबर हा कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेना कोणाची? हे प्रकरण नवीन घटनापीठासमोर वर्ग होणार आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात निकाल येण्याच्या, आशा मावळल्या आहेत. 10 नोव्हेंबरला विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख 18 नोव्हेंबर आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त होत असल्याने आता नव्या पीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला आहे. शिवसेना (Shivsena) पक्ष आणि संघटना फुटल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. शिवसेना पक्ष आणि चिन्हं निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांच्या बाजूने दिले. उद्धव ठाकरे यांनी यावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होती.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल यावा, अशी अपेक्षा होती. तसे त्यांनी जाहीर सभातून बोलून देखील दाखवले होते. वेळप्रसंगी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना टोमणे देखील मारले होते. आता मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे, यावरील सुनावणीची संभाव्य तारीख 18 नोव्हेंबर आहे. परंतु 10 नोव्हेंबर हा विद्यमान सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचे चिन्ह प्रकरणाचा निकाल येणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे. आता हे प्रकरण नव्या पीठाकडेसमोर जाणार आहे.

कालपर्यंत या प्रकरणाची संभाव्य तारीख 10 नोव्हेंबर होती. मात्र आता आलेल्या यादीत ही तारीख 18 नोव्हेंबर असल्याने मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या काळात या प्रकरणाचा निकाल लागण्याच्या आशा मावळल्यात. फेब्रुवारी 2023 मध्ये हे प्रकरण उद्धव ठाकरे यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल होते. त्यावर ऑगस्ट महिन्यापासून सुनावणी झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT