Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : तुम्ही सभागृहात गप्प कसे बसलात?: नाराज उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना विचारला जाब...

Mayor's Bungalow Renovation : महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांवर नाराजी व्यक्त केली. जनतेच्या पैशांच्या अपव्ययावर गप्प का राहिलात, असा सवाल त्यांनी केला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 10 May : मुंबई महापालिका महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा सध्या जोरात गाजत आहे. मात्र, त्याच मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असताना गप्प का बसलात?, असा जाब त्यांनी काही नगरसेवकांना विचारल्याची माहिती आहे.

ठाकरेंची अनेक वर्षांची सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेची सत्ता प्रथमच ताब्यात घेतली आहे. महापौरपदी रितू तावडे (Ritu Tawade) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार घेतल्यानंतर तावडे यांनी महापौर बंगल्याचे नूतनीकरणाचे काम काढले आहे. मात्र, नूतनीकरण आणि खर्चाच्या मुद्यावर महापौर तावडे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

मुंबईचे महापौर निवासस्थान (Mayor's Bungalow) हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्याने हे निवासस्थान भायखळ्याला हलविण्यात आले आहे. गेली चार वर्षे पालिकेवर प्रशासक होता, त्यामुळे तो बंगला बंद अवस्थेत होता. मात्र, नव्या महापौर रितू तावडे यांनी त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी तब्बल ३ कोटी ४० लाखांहून अधिक खर्च प्रस्तावित आहे.

पूर्वी लाखांमध्ये असलेला खर्च आता कोटींमध्ये गेल्याने तो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे जानेवारीमध्ये ७५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांची कान उपटले आहेत. त्यांनी आपल्या नगरसेवकांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्ती केल्याची माहिती आहे.

महापौर बंगल्याच्या खर्चाचा मुद्दा सभागृहात आक्रमपणे का मांडला नाही. जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असताना तुम्ही सभागृहात गप्प कसे बसलात? असा जाब उद्धव ठाकरे यांनी काही नगरसेवकांना विचारल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT