भाग्यश्री प्रधान
Kalyan : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याण येथे येणार आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यद तयारी सुरू आहे. ठाकरेंचा कल्याण दौरा घोषित होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री 26 जानेवारीला कल्याणध्ये येणार होते. मात्र, ठाकरे येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या दौराची तारखी बदलल्याची चर्चा आहे.
13 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे कल्याण मध्ये येणार आहेत. याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कल्याण मध्ये येणार असल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघात आढावा घेण्यासाठी येत आहेत तर विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कल्याण मध्ये येणार आहे. एकच दिवशी दोन्ही नेते कल्याणमध्ये असल्याने दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 जानेवारीला येणार असल्याची चर्चा होती. या संदर्भात शिंदे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी देखील पूष्टी दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे येत आहेत हे कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील ताच दिवशी येणार असल्याचे सांगितले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
13 जानेवारीला उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान देण्यासाठी उमेदवार कोण असेल यावर विविध तर्क वितर्क लढवले जातायत .उद्धव ठाकरे आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करताय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.