Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेवरून मंगळवारी (ता.16) पत्रकार परिषद घेतली. या वेळी ठाकरे गटाने पुरावे, व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केले.या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. या वेळी त्यांनी राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणावा असे थेट खुले आव्हानही दिले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या पत्रकार परिषदेत भाजप शिंदे गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीकेची तोफ डागली.ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत.पण आज जनतेच्या न्यायालयात आलो आहोत.गेल्या आठवड्यात लबाडानं... लवादानं निकाल दिला.नार्वेकर व मिंधे गटाने विना सुरक्षा येऊन सांगावे की, शिवसेना कुणाची.मीही विना संरक्षण येतो.मग जनतेने ठरवावे कुणाला पुरावे,कुणाला गाडावे असा हल्लाबोल त्यांनी केला.
ठाकरे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. तर शिंदे गट उच्च न्यायालयात गेला आहे. तेही नार्वेकरांच्या निकालावरही समाधानी नाही. त्यामुळे त्यांनी आता राज्यपालांमार्फत विशेष अधिवेशन बोलावत विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणावा, त्याला आमचा पाठिंबा असेल असेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आयोग,ईडी हे सर्वच केंद्रातील भाजप सरकारचे नोकर आहेत.राज्यपाल म्हणून दुसरा नोकर इकडे बसवला होता. त्यांनी बोलावले अधिवेशन असंविधानिक होते.त्या कटात ते सहभागी होती.ही केवळ शिवसेनेची लढाई नाही,लोकशाही जिवंत राहणार की नाही याची आहे.जल्लादाचे काम लवादाला दिले होते.फाशी द्यायचे सोडून तो दोषींचा जन्मदाखला नसल्याचे कारण सांगत असल्याचा घणाघातही ठाकरेंनी या वेळी केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.