Gopichand Padalkar : अजित पवार महायुतीत सहभागी का झाले? पडळकरांनी सांगितलं मोठं कारण...

Ajit Pawar, Baramati : बारामतीत भाजपचा खासदार होणार...
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत दाखल होताच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा बारामतीबाबत कॉन्फिडन्स वाढल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये अजित पवारांविरोधात सपाटून पराभूत झाल्यानंतर पडळकर बारामतीकरांना दुर्मिळ झाले होते. यातच पवार सत्तेत गेल्यानंतर पहिल्यांदा आलेल्या पडळकांनी बारामतीत भाजपच्या विचाराचा खासदार होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) मंगळवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच अजितदादा भाजपसोबत का आले, याचेही कारण सांगितले. ते म्हणाले, बारामतीत भाजप चांगले काम करीत होते. ते पाहूनच अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. पडळकारांच्या या विधानानंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. यावर अजित पवार काय बोलणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष आहे.

Gopichand Padalkar
Uddhav Thackeray Maha Press Conference : 'नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या, सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात'

आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Baramati) बारामतीतून भाजपच्या विचाराचा खासदार असणार, असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला. ते म्हणाले, आता अजित पवार महायुतीत सहभागी झाले आहेत. भाजपचे जास्तीत जास्त खासदार दिल्लीला पाठवायचे आहेत. भाजपला बारामती जिंकायची आहे. त्यानुसार आता बारामतीचा खासदार आमच्या विचाराचा होणार, हे एक लाख टक्के खरे आहे. मात्र तो भाग्यवान कोण असेल ते माहिती नाही, असे पडळकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पडळकांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. ठाकरेंना विधानसभाध्यक्षांनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर कोर्टात जावे. ठाकरे यांच्यासोबतची 50 आमदार निघून गेले. ते बहुमत चाचणीला थांबलेच नाहीत. याचा अर्थ ठाकरेच सर्वात आधी पळून गेले होते. लोकांनी २०१९ मध्ये भाजपला कौल दिला होता. मात्र त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे काहीही राहिले नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी बारामतीच्या दुष्काळी भागातील समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडे घालणार असल्याचे सांगितले. बारामतीत भाजप चांगले काम करीत आहे. अनेक दिवस आलो नसलो तरी अनेक लोकांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ते ओबीसी कोट्यातून नको. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आल्याचा दावाही पडळकारांनी यावेळी केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Gopichand Padalkar
Pune Police : पाय घसरून पडले, चर्चा मात्र आत्महत्येची; पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com