Devendra Fadnavis, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : दारुण पराभवानंतर ठाकरेंनी पुन्हा डरकाळी फोडली; म्हणाले, 'ते फडण'वीस' असले तरी आपण...'

Political News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकल्या आहेत. त्यानंतर सेनेच्या आमदारांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीच्या या लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकल्या आहेत. त्यानंतर सेनेच्या आमदारांची पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत भास्कर जाधव यांची विधानसभेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली. तर, सुनील प्रभू पुन्हा एकदा पक्षाचे प्रतोद बनले आहेत. तर, आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. (Uddhav Thackeray News)

विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे विरोधी महाविकास आघाडीत एकदम शांतता पसरली होती. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडून आलेल्या 20 आमदारांची मातोश्रीवर बैठक घेत त्यांनी शिवसेनेतील (Shivsena) आमदारांना मार्गदर्शन करीत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते फडण’वीस' असले तरी आपणही वीस आहोत, आपण त्यांना पुरून उरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भास्कर जाधव यांनी येत्या काळात सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही महाविकास आघाडी एकत्र मिळून विरोधीपक्षनेते पदासाठी दावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी आमदार भास्कर जाधव यांची गटनेतेपदी तर सुनील प्रभु यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले,मागील सात टर्मपासून आमदारकीचा अनुभव आहे. आदित्य ठाकरे यांना गटनेतेपदी नियुक्त करण्यात यावे अशी माझी मागणी होती. पण उद्धव ठाकरेनी आदेश दिला आणि मी तो मान्य केला. त्यामुळे आता मी गटनेतेपदी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात मला विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यास मला विरोधीपक्षनेता व्हायाला नक्कीच आवडेल, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी नेते निवडून आले आहेत. त्या तुलनेत विरोधीपक्ष संख्येने छोटा आहे. तरीही हा विरोधीपक्ष सत्ताधाऱ्य़ांना पुरून उरेल, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, इतर पक्षांप्रमाणेच आमच्याही पक्षातील विधिमंडळ पक्षनेत्याची निवडणूक घेण्यात आली. आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, शिंदेंकडून चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे यांचीही नियमाप्रमाणे निवड कऱण्यात आली आहे. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळीची जागा 8 हजार मतांनी जिंकली असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईच्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटापुढे खरे आव्हान असणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर एकट्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. आता नव्या सरकारमध्ये बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत आपला बीएमसीचा बालेकिल्ला वाचवण्याचे आव्हान आता ठाकरे गटासमोर राहणार आहे.

बीएमसी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पराभव झाला, तर बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणातील एकनाथ शिंदे यांचा वारसावरचा दावा अधिक भक्कम होईल आणि त्याचा फटका ठाकरे गटाला बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT