Vaishali Darekar vs Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Vaishali Darekar News : '...म्हणून हॅटट्रिक चुकू शकते' म्हणत वैशाली दरेकरांनी श्रीकांत शिंदेंना लगावला टोला!

शर्मिला वाळुंज

Loksabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करत त्यांना उमेदवारी दिली आहे, म्हणजे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार झाल्या आहेत, तर महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असून, तिसऱ्यांदा संधी मिळाल्यास त्यांना विजयाची ते हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या दरेकर यांनी यावरून 'हॅटट्रिक चुकू शकते' असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उमेदवारी मिळेल असे निश्चित नव्हते. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी नाव जाहीर करत माझ्यावर विश्वास दाखविला आहे, असं म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'शिवसेनेची(ठाकरे गट) परंपरा आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झाली आहे. मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. 100 टक्के मी सांगते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाची खासदार म्हणून मी संसदेत दाखल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय 'कधी कधी हॅटट्रिक चुकते. बॉलरला वाटत असतं हॅटट्रिक घेऊ, समोरचा बॅट्समनदेखील त्यांच्यासाठी नवीन असेल, परंतु जनतेसाठी जुना जाणता असेल तर हॅटट्रिक चुकते. आणि मला वाटतं या वेळेला ती शक्यता जास्त आहे. श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांना खासदार करण्यासाठी येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी मदत केलेली आहे,' असंही दरेकरांनी सांगितलं.

'शिवसेना या चार वाक्याने त्यांना तिथपर्यंत नेलेले आहे. शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे ते दोनदा खासदार झालेले आहेत हे त्यांनी विसरू नये. आणि मला असं वाटतं की ते शिवसैनिक पुन्हा येथे नवीन खासदार निवडून देतील,' असे दरेकर यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT