Mahavikas Aghadi Meeting  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi Meeting : आंबेडकर महाआघाडीची बैठक सोडून बाहेर आले अन्‌ बॉम्बच टाकला...

Prakash Ambedkar News : मी (वंचित बहुजन आघाडी) महाविकास आघाडीसोबत नाही. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे.

Jui Jadhav

Mumbai News : मी (वंचित बहुजन आघाडी) महाविकास आघाडीसोबत नाही. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. काँग्रेससोबत सध्या चर्चा सुरु आहे, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे आंबडेकर यांचा काँग्रेसवरील राग अजूनही गेल्याचे दिसत नाही. (Vanchit still not participating in Mahavikas Aghadi : Prakash Ambedkar)

महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित आघाडीचे प्रमुख आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, वंचित आघाडी अद्यापही महाविकास आघाडीचा भाग नाही. आम्ही केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आहेत. पुढील आठवड्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार आहेत, त्यानंतर पुढील बोलणी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीची बैठक अजून चालू आहे. मला बाहेर जायचे आहे; म्हणून मी निघालो आहे. जे मुद्दे मी बैठकीत ठेवले होते, त्या मुद्द्यांच्या संदर्भात तीनही पक्ष अंतर्गत चर्चा करत आहेत. या मुद्द्यांमध्ये आणखीन काही मुद्दे ॲड करायचेत का, ते केले जातील आणि नंतर एक ड्राफ्ट तयार होईल. इतर मुद्द्यावरील चर्चा ही कंटिन्यू राहील. मला काही कामानिमित्त बाहेर जायचे आहे, त्यामुळे मी निघालो आहे, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.

आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीची इंडिया होऊ नये, याची आम्ही दक्षता घेत आहोत. ताक जरी असले तरी फुंकून पित आहोत. जागावाटपाचा मुद्दा पुढच्या बैठकीत असेल. आजच्या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रमाबद्दल चर्चा झाली आहे.

इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेस हे लास्ट पार्टनर राहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे ते दोघेही वेगळे झालेले आहेत. काँग्रेस वेगळी जात आहे. शरद पवार गटसुद्धा वेगळा जात आहे, त्यामुळे राज्यात अशी परिस्थिती घडू नये, यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT