Lok Sabha Election 2024 : दिल्लीचे लक्ष्य आता महाराष्ट्रातील 'महाविकास आघाडी' फोडण्याचे...

Mahavikas Aghadi News : उद्धव ठाकरेंचे उरलेले आमदारांना फोडून, काँग्रेसमध्येही तोडफोड करण्याचे दिल्लीश्वरांचे प्रयत्न...
Mahavikas Aghadi News
Mahavikas Aghadi NewsSarkarnama
Published on
Updated on

संजय परब -

Mumbai News : पश्चिम बंगाल, पंजाबनंतर बिहारमध्ये सुद्धा भाजपच्या मनासारख्या घटना घडून इंडिया आघाडीची शकले पडत असताना, आता दिल्लीश्वरांचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी उध्दव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या एकजूटीतील महाविकास आघाडी फोडण्याचे डावपेच आखले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपास यंत्रणांना हाताशी धरून उध्दव ठाकरे आणि पवारांच्या शिल्लक आमदारांना सुद्धा भाजपमध्ये आणायचे आणि नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे बडे नेते गळाला लावून उरल्या-सुरल्या आघाडीला सुरुंग लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

Mahavikas Aghadi News
Akola Vanchit News : महाविकास आघाडीत येऊन 'वंचित'ला मिळणार का बालेकिल्ला?

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नितीशकुमार या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी वेगळी चूल मांडल्याने भाजपमध्ये सध्या खुशीचे वातावरण आहे. राममंदिर आणि कलम 370 मुळे 2024 मध्ये आमचा विजय निश्चित झाला असून, आम्हाला आता वेध लागले आहेत ते 2029 लोकसभेचे, असा भाजपचा होरा आहे. मात्र भाजप हा देशात असा एकमेव पक्ष आहे, जो वर्षाचे 365 दिवस फक्त राजकारण करतो. आपल्या विरोधकांना किंचितही मोकळीक राहता कामा नये, असा विचार करत असतो. याचमुळे आता त्यांनी महाराष्ट्रात आघाडीची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेऊन सुद्धा महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे मिशन यशस्वी होताना दिसत नसल्याने, भाजप पक्षश्रेष्ठी अस्वस्थ आहेत. गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांचा तसेच, भाजप आणि खासगी यंत्रणांचा अहवाल हा भाजपचे मिशन यशस्वी होत नसल्याचे सांगत आहे. महाविकास आघाडी 48 पैकी किमान 25 ते 30 जागा मिळवतील, असा अंदाज सांगितला जात आहे. उध्दव ठाकरे यांना लोकांची सहानभुती कायम असून शरद पवार आपले सारे कसब पणाला लावत आहेत. काँग्रेससुद्धा अजून पुऱेशी डळमळीत झालेली नसल्याने, भाजपचे निवडणूक रणनीतीकार नवीन चाल खेळण्याचे डावपेच आखत आहेत. (Latest Political News)

Mahavikas Aghadi News
NCP Hearing : शरद पवारांकडून दुसऱ्या चिन्हाची चाचपणी? राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवरून चर्चेला उधाण!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उध्दव ठाकरे यांना यापुढे कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळवू द्यायची नाही आणि यासाठी भाजप नेते, तसेच प्रवक्ते यांनी मातोश्रीवर आधी सडकून टीका करणे बंद करावी, असे आदेश निघाल्याचे बोलेले जात आहे. यामुळे गेले काही महिने सतत टीकेचा आसूड घेऊन उभे असलेले नारायण राणे आणि त्यांची दोन चिरंजीव निलेश आणि नितेश राणे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना सध्या थोडे शांत बसण्यास सांगण्यात आल्याचे कळते. यामुळे गेले काही दिवस उध्दव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर होणारी टीका आता कमी झाली आहे. या बरोबर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा शांतचित्त झाल्याचे दिसत आहे. (Mahavikas Aghadi News)

टीकेच्या आघाडीवर एक पाऊल मागे घेताना तपास यंत्रणा मात्र आघाडीची कोंडी करताना दिसत आहेत. आमदार रवींद्र वायकर आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून, अनिल परब आणि संजय राऊत यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना अटक झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनप्रकरणी चौकशीला बोलावले जाऊ शकते. आदित्य यांना अटक केली तर राज्यात मातोश्रीला निवडणुकीत आणखी फायदा होईल, या शक्यतेने फक्त चौकशीचा फास फेकण्याचा विचार केला जात आहे, असे समजते.

Mahavikas Aghadi News
Dharashiv NCP News : धाराशिव राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली; पवारांना 'अ‍ॅक्शन' घ्यावी लागणार

दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांची चौकशी झाल्यानंतर आता पवारांचे आणखी कोण नेते चौकशीच्या रडारवर आणता येतील आणि कोण फुटू शकतील? याचा सुद्धा भाजपकडून विचार केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतरसुद्धा भाजपने आशा सोडलेली नाही. हे कमी म्हणून की काय काँग्रेसचे नेते आपल्या बाजूने वळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांना चाचपून झाले असून निवडणुकीच्या तोंडावर काही महत्वाचे काँग्रेस नेते आपल्याकडे येतील, यासाठी भाजप डावपेच आखत असल्याचे कळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com