devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray sarkaranama
मुंबई

Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेला कोकणात मित्रपक्षांत झुंज; तर मुंबईत भाजप विरुद्ध ठाकरे थेट लढत

Vidhan Parishad Election News : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Akshay Sabale

Mumbai News, 3 June : लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election 2024 ) निकाल लागताच विधानसभेपूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणूक ( Vidhan Parishad Election 2024 )होणार आहे. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर मनसे आणि ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केले होते.

यातच आता भाजप आणि शिंदे गटानं उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे विरुद्ध शिंदे गट, अशी मित्रपक्षांमध्ये लढत होणार आहे.

'एनडीए'ला बाहेरून पाठिंबा दिलेल्या मनसेनं ( Mns ) भाजपच्या जागेवर अर्थात कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे ( Abhijeet Panse ) यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे पानसे महायुती की मनसेचे उमेदवार, याबाबत चर्चांना उधाण आलं होतं.

पण, भाजपनं विद्यमान आमदार निरंजन डावखरे ( Niranjan Davkhare ) यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, शिंदे गटानं येथून संजय मोरे ( Sanjay More ) यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्षांमध्ये तिहेरी लढत रंगणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपनं किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे. शेलार यांचा 'सामना' उद्धव ठाकरे यांचे शिलेदार अनिल परब ( Anil Parab ) यांच्याशी होणार आहे. तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपनं शिवनाथ दराडे यांना संधी दिली आहे. दराडे यांची लढत ठाकरे गटाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांच्याशी होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा?

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला होता. त्यानुसार चार जागांसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे. विलास पोतनीस, निरंजन डावखेरे, कपिल पाटील, किशोर दराडे 7 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT