Mumbai News, 3 June : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही भाजपविरोधात वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवला आहे.
एक्झिट पोलनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चिखलफेक सुरू झाली आहे. भाजपला पाठिंबा देणारे आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे निकालानंतर 20 दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर रवी राणांवर सडकून टीका केली जात आहे. यातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी रवी राणांना थेट धमकी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, "कोण रवी राणा... काय नाव घेताय तुम्ही... त्यांचा राजकारणाशी संबंध कधी आला? शिवसेना देशातील राजकारणात जुना पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. तर, उद्धव ठाकरे पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून पक्षाचं नेतृत्व करत आहेत. पक्षाचे 18 खासदार निवडून आले आहेत. परत निवडून येतील. अशा पक्षाच्या भुमिकांवर कुणी ऐऱ्या गैऱ्यानं बोलावं... हे बरोबर नाही."
" तुम्ही तुमचं बघा. तुम्ही तुमच्या निवडणुका लढा. ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका. आमच्या भूमिका आम्ही एकत्र बसून ठरवतो. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील," असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.
रवी राणा काय म्हणाले?
"निवडणुकीच्या निकालानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत येतील. मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे, त्यातून उद्धव ठाकरे येतील," असं आमदार रवी राणांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.