डोंबिवली : नांदिवली येथील 'श्री बालचिकित्सा क्लिनिक'मध्ये एका रिसेप्शनिस्ट तरुणीला एका तरुणानं लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संध्याकाळच्या वेळेत क्लनिक उघडल्यानंतर डॉक्टरांनी पेंशटला आत घेण्याऐवजी एमआर (औषध कंपन्यांचे प्रतिनिधी) लोकांना केबिनमध्ये बोलावलं. यामुळं आपल्या बाळाला तपासणीसाठी घेऊन आलेल्या एका जोडप्याचा नातेवाईक असलेला तरुण प्रचंड संतापला आणि त्यानं हे कृत्य केलं. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली कळासरे (वय २५) असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव असून गोकुळ झा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचं नाव आहे. कल्याणमधील पिसवली गावात पीडित तरुणी राहते. नांदिवली येथील डॉ. अनिकेत पालांडे यांच्या 'श्री बालचिकित्सालय क्लिनिक'मध्ये ती रिसेप्शनिस्ट ग्हणून काम करते. पीडित तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी 10 ते दुपारी 2 व संध्याकाळी 6 ते 10 अशा दोन शिफ्टमध्ये ती या क्लिनिकमध्ये काम करते. सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास ती कामावर गेली. त्यावेळी क्लिनिकमध्ये डॉक्टर आलेले नव्हते, तसंच क्लिनिकमध्ये 4 ते 5 पेशंट डॉक्टरची वाट बघत बसले होते. संध्याकळी 6.35 वाजण्याच्या सुमारास डॉंक्टर क्लिनिकमध्ये आले. त्यावेळी काही एमआर लोक डॉक्टरला भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेले.
दरम्यान, एक महिला व पुरुष त्यांच्या बाळाला तपासणीसाठी घेऊन क्लिनिकमध्ये आलेले होते. त्यांच्यासोबत गोकूळ झा नामक एक 25 वर्षीय मुलगा जो त्यांचा नातेवाईक होता तो ही आला होता. पेशंट बाहेर वाट पाहत असताना एमआर लोक डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानं गोकूळ झा हा सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायला निघाला. त्यावेळी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या सोनालीनं डॉ. सध्या बिझी आहेत, तुम्ही थोडा वेळ वाट पाहा असं सांगितलं. तिनं असं सांगताच हा तरुण संतापला आणि त्यानं सोनालीला शिवीगाळ करत आत कोण बसलं आहे त्यांना बाहेर बोलवा, आम्हाला आत जायचं आहे असं सांगितलं. यावर सोनालीनं शिवीगाळ करू नका असं त्याला सांगितलं.
यानंतर हा तरुण क्लिनकाबाहेर गेला आणि लगेच पुन्हा आत आला आणि शिवीगाळ करत त्यानं थेट सोनाली यांना जोरात लाथेनं मारलं. यामुळं सोनाली गडबडल्यानं खाली पडली त्यानंतर या तरुणानं तिला ओढून हातानंही मारहाण केली. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळं क्लिनिकमधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही गोंधळले पण त्यांनी सोनालीला त्याच्या तावडीतून सोडवलं. गोंधळ ऐकू येताच डॉक्टर केबिनमधून बाहेर आले आणि त्यांनी हे भांडण मिटवलं. या प्रकारानंतर पीडित सोनालीनं मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.