Devendra Fadnavis : "फडणवीस हे हुशार, प्रामाणिक राजकारणी, भविष्यात...."; वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंकडून तोंडभरुन कौतुक

Devendra Fadnavis : गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं प्रकाशित करण्यात आलेल्या फडणवीसांच्या कार्यकर्तुत्वासंबंधीच्या 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनी कौतुकाची थाप दिली आहे.
Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. फडणवीसांचा आज वाढदिवस आहे, यानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं प्रकाशित करण्यात आलेल्या फडणवीसांच्या कार्यकर्तुत्वासंबंधीच्या 'महाराष्ट्र नायक' या पुस्तकात उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनी कौतुकाची थाप दिली आहे. तसंच इतर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील आपल्या फडणवीसांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Thane Crime: संतापजनक! जामिनावर सुटलेल्या आरोपीची अल्पवयीन पीडितेच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवत मिरवणूक

उद्धव ठाकरेंनी यात लिहिलंय की, "पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा मेहनती नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस. ते हुशार आणि प्रामाणिक राजकारणी असून सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करतात. यामुळं त्यांना भविष्यात केंद्रात महत्वाची जबाबदारी मिळू शकते"

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

तर फडणवीसांच्या कामाची गती अफाट आहे, त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत? असा प्रश्न मलाही पडतो. अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा उल्लेख केला आहे.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Savali Bar Case: 'सावली बार'वर दोनदा कारवाई! FIR, RTI मधून मिळाली माहिती; योगेश कदमांसाठी अनिल परबांनी दिले पुरावे

दरम्यान, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पांसाठी २४,००० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तर १०,००० नागरिकांना रोजगार मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com