Thane Crime: संतापजनक! जामिनावर सुटलेल्या आरोपीची अल्पवयीन पीडितेच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवत मिरवणूक

Thane Crime: या प्रकारामुळं संतप्त झालेल्या नीलम गोऱ्हेंनी पोलिसांना दिले कडक कारवाईचे आदेश
Thane Crime News
Thane Crime News
Published on
Updated on

Thane Crime News : विनयभंग प्रकरणात तुरुंगातून जामिनावर सुटून आलेल्या आरोपीनं अल्पवयीन पीडित मुलीच्या घरासमोर फटाके वाजवत आणि ढोल-ताशे वाजवत मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर इथं ही घटना घडली असून, याची माहिती कळताच संतापलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी थेट पोलीस महासंचालकांना फोन करुन आरोपीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.

Thane Crime News
Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

गोऱ्हे म्हणाल्या, “उल्हासनगर इथं तीन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्यानंतर त्यातील आरोपी रोहित झा याला जामीन मिळाला आणि तो जामिनावर सुटल्यावर वाजतगाजत मिरवणूक काढून पीडित मुलींना धमकावण्याचा प्रयत्न करतो, ही अतिशय निंदास्पद व हीन प्रवृत्ती आहे. गुन्हा करून सुटल्यानंतर पीडितांना मानसिक त्रास देणे हे अजिबात सहन केले जाणार नाही. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

मी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. पीडित मुलींना पुन्हा धमकावले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी काही संरक्षणात्मक उपाययोजना देखील हाती घेतल्या आहेत. तसेच, पीडित मुलींना समुपदेशन देऊन त्यांचा धीर वाढवणे आवश्यक आहे,” असे गोऱ्हे यांनी सांगितलं.

Thane Crime News
Savali Bar Case: 'सावली बार'वर दोनदा कारवाई! FIR, RTI मधून मिळाली माहिती; योगेश कदमांसाठी अनिल परबांनी दिले पुरावे

आरोपीने जामिनाच्या अटींचे उघड उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असून, हा कायद्यावरील विश्वास डळमळीत करणारा प्रकार घडला आहे. या घटनेच्या आधारे न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करून आरोपी रोहित झा याचा जामीन रद्द करण्यासाठी तातडीनं प्रस्ताव दाखल करावा. तसंच, जामिनाच्या अटींचं उल्लंघन व न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल नवीन गुन्हा दाखल करून आरोपीला त्वरित ताब्यात घ्यावं, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले.

Thane Crime News
Karuna Munde: महाराष्ट्राचं राजकारण हादरवणाऱ्या 'हनी ट्रॅप' प्रकरणात धक्कादायक वळण; करुणा मुंडेंनी 'त्या' महिलेलाच समोर आणलं

तसंच, आरोपीच्या मिरवणुकीत सहभागी सर्व व्यक्तींवर कारवाई करून या प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करावा, पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे व परिसरात अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त स्तरावर सतत आढावा घेतला जावा, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. अल्पवयीन मुलींवर विनयभंगासारखे गुन्हे आणि त्यानंतर पीडितांना धमकावण्याच्या घटना थांबवण्यासाठी पॉक्सो कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व समाजातील अशा प्रवृत्तीवर वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे,” असं मतंही गोऱ्हे यांनी मांडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com