Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar CM Post : अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, असं आम्हालाही वाटतं; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं विधान

Vijaykumar Dudhale

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं आम्हालाही वाटतं. त्यासाठीच ते भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत, असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. असे विधान करून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे. (We also think that Ajit Pawar should become the Chief Minister : Sanjay Raut)

भारतीय जनता पक्षासोबत गेल्यापासून अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार शिवसेना आमदारांचा निकाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत,’ असे सुनील तटकरे यांनी म्हटले असले तरी त्यात काय वावगं आहे. प्रत्येकाला वाटतं मुख्यमंत्री व्हावं. आम्हालाही वाटतं, की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. तटकरे यांनाच कशाला वाटायला पाहिजे. अजितदादांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळायला पाहिजे, असं मलाही वाटतं; पण त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील, असेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले.

अजित पवार इतकी वर्षे राजकारणात आहेत, पण मुख्यमंत्रिपदासाठीच त्यांनी पक्ष सोडला आहे. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला त्यांनी सोडले आहे. अजित पवार हे येत्या 31 डिसेंबरला मुख्यमंत्री होणार आहेत का. कारण 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपदाची जागा खाली होते आहे. ते झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही राऊत यांनी नमूद केले.

दरम्यान, अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी येत्या 31 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खाली होणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार अपात्र होतील, असे सूचित करायचे आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आडून राऊतांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT