Hiraman Khoskar Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election विधान परिषदेच्या मतदानाबाबत काँग्रेसच्या हिरामण खोसकरांनी भूमिका केली स्पष्ट....

Vijaykumar Dudhale

Mumbai, 12 July : विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या नावाची चर्चा असली तर आपण काँग्रेस पक्षासोबत राहणार असून शंभर टक्के काँग्रेसला मतदान राहणार आहे, अशी भूमिका काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी मांडली.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंणगात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाची गुरुवारी रात्री बैठक झाली. मात्र, त्या बैठकीत कोणतीही स्ट्रॅटेजी ठरविण्यात आलेली नाही. आता पक्षाच्या बैठकीत आम्हाला आदेश दिले जातील.

महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तीनही पक्षांची बैठक नुकतीच झाली आहे. आता कोणाला मतदान करायचं, याचा आदेश आता आमच्या पक्षाचे प्रमुख देतील. तसं इतर दोन्ही पक्षाचे प्रमुख त्यांच्या आमदारांना मतदानाबाबत सांगतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खोसकर म्हणाले, आमच्या पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा पक्षाला विश्वास आहे, त्यामुळे आमचे आमदार हॉटेल बाहेर दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे महाविकास आघाडीच्या लोकांनी एकत्रित काम केले, तसेच काम आताही होणार आहे, त्यामुळे आमचे आमदार निर्धास्त आहेत.

आमच्या पक्षाचे तीन आमदार फुटतील, असे आमच्या नेत्यांनी सांगितले असले तरी आम्ही सर्व आमदार पक्षासोबत राहणार आहोत. आम्ही सर्वजण इमानदारीने काँग्रेसला मतदान करणार आहोत, त्यात काहीही बदल होणार नाही, असेही खोसकर यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंंगाने माझ्या नावाची चर्चा होत असली तरी माझे मत शंभर टक्के काँग्रेस पक्षालाच राहणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसोबत राहणार आहे, असे आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT